रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अ‍ॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ७०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटातील बरीच गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बॉबी देओलच्या एन्ट्रीचं ‘जमाल जमालो कुडू’ हे गाणं विशेष लक्ष वेधून घेतं. या गाण्यावर आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अविनाश व ऐश्वर्या नारकरांनी जबरदस्त डान्स केला आहे.

अविनाश व ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विविध गाण्यांवर डान्स करून ते दोघंही त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करतात. या दोघांचा फिटनेस आजच्या तरुणपिढीला लाजवेल असाच आहे. नारकर जोडप्याने नुकताच बॉबी देओलचं एन्ट्री गाणं ‘जमाल कुडू’वर अभिनेत्री अश्विनी कासारसह जबरदस्त डान्स केला आहे. त्यांचं रिल इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडीओला अवघ्या तासांतच दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”

हेही वाचा : Video: बिग बी आले, विहीणबाईंना भेटले अन्…; अनफॉलो केल्याच्या चर्चांनंतर अमिताभ बच्चन व ऐश्वर्या राय समोर आल्यावर काय घडलं?

नारकरांनी या व्हिडीओला “आम्ही आनंदी असल्याने डान्स करत आहोत” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये तिघांनीही हुबेहूब स्टेप्स केल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने, “सगळं लक्ष अविनाश नारकर साहेबांनी वेधून घेतलं” अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका युजरने या व्हिडीओवर “ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या स्टेप्स एकदम परफेक्ट आहेत” असं म्हटलं आहे. आणखी काही युजर्सनी “तिघेही छान नाचले, तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे ” अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिली आहे.

हेही वाचा : “माझ्या सगळ्या स्किटमध्ये…”, गौरव मोरेने सांगितलं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून ब्रेक घेण्याचं कारण

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते दोघंही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. याशिवाय सोशल मीडियावर सक्रिय राहत ते दोघंही चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करतात.

Story img Loader