ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. मालिका, नाटक, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दमदार अभिनयाशिवाय प्रेक्षकांची ही लाडकी जोडी रील्स व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. विविध ट्रेडिंग गाण्यावर हे दोघंही जबरदस्त डान्स करत असतात. नुकताच या जोडीने मल्याळम गाण्यावर डान्स केला आहे. याबद्दल जाणून घेऊयात…

ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टारबरोबर अभिनेत्री जान्हवी कपूर झळकणार आहे. हा ‘देवरा’ चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील ‘फिअर साँग’ सध्या सर्वत्र ट्रेंड होत आहे. यासाठी नेटकरी देखील हूकस्टेप करत डान्स व्हिडीओ बनवत आहे. नारकर जोडप्याने देखील याच गाण्यावर जबरदस्त डान्स करत व्हिडीओ बनवला आहे. यावेळी या जोडप्याच्या सोबतीला ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ फेम अभिनेत्री अश्विनी कासार देखील होती.

aishwarya narkar dance on koli song
Video : ऐश्वर्या नारकरांचा मेकअप रुममध्ये कोळी गाण्यावर जबरदस्त डान्स; सोबतीला होत्या मालिकेतील ‘या’ अभिनेत्री
Aishwarya Narkar And Avinash Narkar again dance on sooseki song of pushpa 2 movie
Video: ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर पुन्हा एकदा ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स, चाहत्यांची जिंकली मनं
aishwarya and avinash narkar dances on navara hach hava song
“नवरा हाच हवा…”, अक्षरा-अधिपतीच्या गाण्यावर नारकर जोडप्याचा सुंदर डान्स! शिवानी रांगोळे कमेंट करत म्हणाली…
Aishwarya Narkar and avinash narkar dance on Dekhha Tenu song of Mr. & Mrs. Mahi movie
Video: ‘देखा तेनु पहली पहली बार…”, नारकर जोडप्याचा रोमँटिक गाण्यावर जबरदस्त डान्स, अविनाश यांच्या एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष
Aishwarya and Avinash Narkar son amey girlfriend play role in zee marathi lakhat ek amcha dada serial
ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार
aishwarya narkar and maadhavi nemkar dance
Video : जेव्हा दोन खलनायिका एकत्र येतात…; ऐश्वर्या नारकर अन् माधवी निमकरचा ‘मोरनी’ गाण्यावर डान्स, नेटकरी म्हणाले…
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल
A 95 year old woman Show her remarkable dancing skills Video Shared by IRAS Ananth Rupanagudi must watch heartwarming clip
कलेला वय नसते! साडी नेसून नृत्यकौशल्य दाखविणाऱ्या ९५ वर्षीय आजींना पाहा; VIDEO तील ‘सादगी’ जिंकेल तुमचेही मन

हेही वाचा : “माझा सुपरहिरो गमावला…”, जय दुधाणेच्या वडिलांचं हृदय बंद पडल्याने निधन, शेअर केली भावुक पोस्ट

‘देवरा’ चित्रपटाचा पहिला भाग सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाची भूमिकेत साकारणार आहे. तसेच अभिनेत्री जान्हवी कपूर ज्युनिअर एनटीआरबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवरील ट्रेडिंग गाण्यांवर नेहमीच व्हिडीओ बनवत असतात. त्यांच्या रील्सला नेटकऱ्यांसह त्यांचे असंख्य चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. अभिनेत्रीने या व्हिडीओला “वायबिंग ऑन बीट्स” असं कॅप्शन दिलं आहे. तर, नेटकऱ्यांनी यावर “कमाल केमिस्ट्री”, “नादखुळा डान्स”, “एक्सप्रेशन कमाल आहेत” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : Video : ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणचा ‘सूसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स! पती सौरभ म्हणाला, “श्रीवल्ली…”

हेही वाचा : Maharaj Review : वादात अडकलेला ‘महाराज’ कसा आहे? आमिर खानच्या मुलाचा पदार्पणाचा चित्रपट पाहावा की नाही? वाचा

दरम्यान, या कलाकारांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अश्विनी कासार सध्या ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तसेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. याशिवाय अविनाश नारकर यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर त्यांच्या ‘कन्यादान’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता लवकरच ते ‘डंका हरी नामाचा’ या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट १९ जुलैला महाराष्ट्राभरात प्रदर्शित होणार आहे.