अलीकडच्या काळात अनेक जुनी गाणी सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. आजच्या तरुण पिढीच्या मनात जुन्या गाण्यांबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण होत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं. आशा भोसले, लता मंगेशकर, अलका याज्ञिक, अभिजीत, उदित नारायण या दिग्गज गायकांनी बॉलीवूडमधली अनेक सदाबहार गाणी गायली आहे. यातील बहुतांश गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सगळ्या गाण्यांवर सामान्य माणसांपासून ते कलाकार मंडळीपर्यंत सगळेजण ठेका धरत असल्याचं पाहायला मिळतं.

मराठी मनोरंजन विश्वाबद्दल सांगायचं, तर यामध्ये ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी विविध ट्रेडिंग गाण्यावर कायमच रील्स व्हिडीओ बनवत असते. नुकताच या जोडप्याने अक्षय कुमारच्या जुन्या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायचं मिळालं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकर यांना ओळखलं जातं. मराठी नाटक असो चित्रपट असो किंवा मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये या दोघांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आज अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम करूनही दोघांची एनर्जी थक्क करणारी असते. सोशल मीडियावर अनेकदा या दोघांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. परंतु, तरीही या सगळ्यांना स्पष्ट भाषेत उत्तर देत हे दोघेही स्वत:ची आवड जपतात. ऐश्वर्या व अविनाश हे दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

हेही वाचा : विकी कौशलचे ‘तौबा तौबा’ गाणे पाहून नेटकऱ्यांना आली कतरिना कैफच्या ‘कमली’ डान्सची आठवण; म्हणाले, “तुला तर चांगली शिक्षिका…”

अक्षय कुमारचा ‘सुहाग’ चित्रपट २० ऑक्टोबर १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता ३० वर्षे उलटली आहे. यामधील “गोरे गोरे मुखडे पे, काला काला चष्मा…” हे गाणं चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तुफान हिट झालं होतं. याच लोकप्रिय गाण्यावर नारकर जोडपं थिरकल्याचं पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या व अविनाश यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे. तर, हे मूळ गाणं अलका याज्ञिक व उदित नारायण यांनी गायलं आगे.

“ऐश्वर्या तुझं वय वाढायचं थांबलं आहे का”, “आय लव्ह धीस कपल”, “खतरनाक एनर्जी”, “वाटच पाहात असते मी आपल्या रील्सची”, “खूप छान”, “वाह वाह क्या बात हैं” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : नितीश चव्हाणच्या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत झळकणार ‘झी मराठी’चा जुना लोकप्रिय चेहरा, जाणून घ्या…

हेही वाचा : “पोटात बुक्का हानला तवा…”, हेमंत ढोमेची पाटलीणबाईंसाठी खास पोस्ट! हटके कॅप्शनने वेधलं लक्ष

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या ‘झी मराठी’वरील मालिकेत मालिकेत अभिनेत्री रुपाली हे खलनायिकेचं पात्र साकारत आहेत. तर, अविनाश नारकर यांच्या ‘कन्यादान’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता लवकरच ते ‘डंका हरी नामाचा’ या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट १९ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.