Aishwarya and Avinash Narkar Dance Video : अभिनेत्री पूजा सावंतने थाटामाटात लग्न केल्यावर आता ती पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे. नुकतंच तिचं ‘नाच गो बया’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पूजा सावंत प्रमुख भूमिकेत झळकणाऱ्या या ‘नाच गो बया’ गाण्याचं दिग्दर्शन प्रशांत नाकतीने केलं आहे. तर, हे गाणं लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. सध्या या गाण्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार या ट्रेडिंग गाण्यावर सध्या रील्स बनवत आहेत. अशातच ऐश्वर्या व अविनाश नारकर ही प्रेक्षकांची लाडकी जोडी आता ‘नाच गो बया’ गाण्यावर थिरकली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. हे दोघंही ट्रेंडिग गाण्यावर नेहमीच भन्नाट डान्स करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. मराठी कलाविश्वात यांची जोडी कायम चर्चेत असते. दोघांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच त्यांनी पूजा सावंतच्या ‘नाच गो बया’ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : पासपोर्ट, पैसे अन् १० लाखांचे सामान लुटले; अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला विदेश ट्रिपवर आला वाईट अनुभव, पोलिसांनी केली नाही मदत

नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स पाहिलात का?

अविनाश यांनी सदरा तर ऐश्वर्या यांनी हिरव्या रंगाची सुंदर साडी, केसात गजरा असा मराठमोळा लूक करून पूजा सावंतच्या ‘नाच गो बया’ गाण्यावर डान्स केला आहे. यांचा डान्स पाहून पूजा सावंत देखील भारावली आहे. नारकर जोडप्याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने “या दोघांचा डान्स पाहून माझा दिवस सुखावला #fanmoment” असं कॅप्शन दिलं आहे.

ऐश्वर्या व अविनाश यांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “खरंच खूप छान सुंदर जोडी आहे तुमची आणि नृत्य तर एक नंबर”, “झकास डान्स…”, “लय भारी…”, “तुम्ही दोघंही खूप सुंदर दिसत आहात” अशा प्रतिक्रिया देत सर्वांनी या जोडप्याचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”

पूजा सावंत नारकर जोडप्याचा डान्स पाहून भारावली

दरम्यान, ‘नाच गो बया’ या गाण्याबद्दल सांगायचं झालं, तर या गाण्यात पूजाबरोबर आयुष संजीव, निक शिंदे, अक्षया नाईक, आकांक्षा गाडे आणि तश्वी भोईर हे कलाकार झळकले आहेत. या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya and avinash narkar dances on nach go baya song of pooja sawant video viral sva 00