अलीकडच्या काळात प्रत्येकाला इन्स्टाग्राम रील्सची भुरळ पडताना दिसत आहे. या रील्स माध्यमावर नेहमीच विविध बॉलीवूड गाणी व्हायरल होत असतात. सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या व्हायरल गाण्यांवर थिरकत असतात. आता संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’नंतर आणखी एक गाणं सर्वत्र ट्रेडिंग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्यावर नुकताच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नारकर जोडप्याने डान्स केला आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर नारकर जोडप्याच्या रील्स व्हिडीओची सर्वाधिक चर्चा रंगते. ट्रेडिंग असणाऱ्या लोकप्रिय गाण्यांवर हे दोघेही भन्नाट रील्स बनवतात. सध्या नारकरांनी शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
हेही वाचा : ‘हीरामंडी’मधील ‘त्या’ सीननंतर अभिनेता ढसाढसा रडला; भारावलेल्या संजय लीला भन्साळींनी दिलं ‘हे’ बक्षीस
नारकर जोडप्याचा व्हायरल गाण्यावर जबरदस्त डान्स
१७ वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये ‘झुम बराबर झुम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा, लारा दत्ता आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचं मुख्य शीर्षक गीत असलेल्या ‘झुम बराबर झुम’ गाण्यावर नारकर जोडप्याने डान्स केला आहे. या व्हिडीओला ऐश्वर्या यांनी “प्रत्येक क्षणाचा आनंद घेत नेहमी मनापासून डान्स करा” असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा : मतदार यादीतून सुयश टिळकचं नाव गायब; खंत व्यक्त करत म्हणाला, “सकाळी ७ वाजता पोहोचलो पण…”
ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “अरे मलाही तुमच्याबरोबर डान्स करायचा आहे”, “अविनाश सरांची एनर्जी खरंच जबरदस्त आहे”, “अविनाश सरांना पाहून कोणालाही डान्स करावासा वाटेल”, “किती एन्जॉय करता”, “तुम्ही दोघे खूपच सुंदर नाचता” अशा असंख्य प्रतिक्रिया अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर आल्या आहेत.
हेही वाचा : “तुझ्याशिवाय एक दिवसही…”, हार्दिक जोशीची अक्षयासाठी रोमँटिक पोस्ट, राणादाने ‘असा’ साजरा केला बायकोचा वाढदिवस
दरम्यान, या जोडप्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ऐश्वर्या नारकर सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत ‘रुपाली’ हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. याशिवाय अविनाश नारकरांच्या ‘कन्यादान’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अविनाश यांच्यासह अनिषा सबनीस, संग्राम साळवी, अमृता बने, स्मितल हळदणकर, चेतन गुरव, शुभंकर एकबोटे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.