अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या दोघांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. अविनाश नारकर यांचा फिटनेस तरुणपिढीला लाजवेल असाच आहे. अभिनयाबरोबरच दोघेही सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट रिल्स बनवतात. सध्या त्यांच्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोघांनीही अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या व्हायरल गाण्यावर डान्स केला आहे.
हेही वाचा : “…आणि आम्ही बंधनात अडकलो”, स्वानंदी टिकेकरचा साखरपुडा थाटात संपन्न, फोटो आला समोर
मध्यंतरी अविनाश नारकर यांनी अभिनेत्री अश्विनी कासारसह अनेक डान्सचे व्हिडीओ बनवले होते. यावेळी प्रेक्षकांनी आता लवकरात लवकर ऐश्वर्या नारकर यांच्याबरोबर व्हिडीओ बनवा अशी मागणी केली होती. त्यानुसार ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी तमन्ना भाटियाच्या व्हायरल ‘कावाला’ गाण्यावर डान्स केला आहे. या ‘कावाला’ गाण्याची विशिष्ट हूक स्टेप आहे ती दोघांनीही या व्हिडीओत केली आहे.
हेही वाचा : ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’, ‘सेक्रेड गेम्स’ गाजवणाऱ्या नवाजुद्दिन सिद्दिकीची पहिली कमाई किती होती माहिती आहे का?
ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला कॅप्शन देत, मी अविनाश यांच्या एनर्जीला मॅच करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. एका दिवसात दोघांच्या या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. एका युजरने यावर कमेंट करत लिहिले आहे की, “खूप दिवसांपासूनची अपेक्षा होती. आज पूर्ण केली, दोघांनी एकत्र येऊन डान्स केलात…लई भारी वाटलं.”
हेही वाचा : आजच्या घडीला मोठं मानधन घेणाऱ्या निवेदिता सराफ यांची पहिली कमाई किती होती माहितेय? स्वतः खुलासा करत म्हणाल्या…
अविनाश आणि ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर आणखी एका युजरने कमेंट करत, “आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही लाजवाल…काय एनर्जी आहे!” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, तमन्ना भाटियाच्या ‘कावाला’ या व्हायरल गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी व्हिडीओ बनवले आहेत.