Aishwarya & Avinash Narkar : मराठी कलाविश्वातील सदाबहार जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हे दोघंही सोशल मीडियावरील विविध ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट रील्स व्हिडीओ बनवत असतात. सध्या नारकर जोडप्याचा एक नवीन डान्स व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची एव्हरग्रीन जोडी प्रेक्षकांमध्ये कायमच चर्चेत असते. त्यांच्या डान्स व्हिडीओवर चाहते कायमच कौतुकाचा वर्षाव करत असतात पण, अनेकदा या जोडीला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. तरीही, नारकर जोडपं या सगळ्या नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करत आनंदाने रील्स व्हिडीओ बनवणं एन्जॉय करतात.
ऐश्वर्या व अविनाश नारकर नुकतेच ‘वर्तमान आँखों का धोखा हैं’ या गाण्यावर थिरकले आहेत. त्यांचा जबरदस्त स्वॅग या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या ट्रेंडिंग गाण्यावर ‘नारकर कपल’ मराठमोळा लूक करून थिरकलं आहे. ऐश्वर्या यांनी सुंदर अशी जांभळ्या रंगाची साडी, नाकाथ नथ आणि अविनाश नारकरांनी सदरा घालून या ‘वर्तमान आँखों का धोखा हैं’ गाण्यावर डान्स केला आहे.
ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओला ‘Going With The Trend’ असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. पूजा सावंत, अक्षया नाईक या अभिनेत्रींनी सुद्धा कमेंट्स करत या जोडप्याचं कौतुक केलं आहे.
“यांच्यासारखं नातं पाहिजे सुंदर…”, “गाणं कोणतंही असो, सरांची एनर्जी लेव्हल एकदम हाय असते”, “एव्हरग्रीन कपल”, “तुम्ही दोघंही खूपच भारी आहात”, “काय एनर्जी आहे कमाल”, “सुंदर ऐश्वर्या”, “हा व्हिडीओ किती सकारात्मक ऊर्जा देतोय” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. या डान्स व्हिडीओला तब्बल १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर, अविनाश नारकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.