ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. या जोडीच्या इन्स्टाग्राम रील्स चर्चेत असतात. आता होळीचा सण येऊ घातल्याने या जोडीने एक नवीन व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होळीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने या कपलने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतीच एक डान्सची रील शेअर केली आहे. ‘राधासंग होली नंदलाल खेलते’ या गाण्यावर दोघे थिरकले आहेत. या रीलमध्ये अभिनेत्रीने सफेद रंगाचा कुर्ता आणि त्यावर बांधणीची ओढणी घातली आहे, तर अभिनेत्याने पिवळ्या रंगाचा शॉर्ट कुरता आणि जिन्स परिधान केली आहे.

होळीच्या गाण्यावर सुंदर डान्सस्टेप करत दोघांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. नारकर कपलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “वयाचा विसर पडेल अशी अदा आहे तुमची”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, “खूप सुंदर डान्स करता तुम्ही दोघं.”

हेही वाचा… लक्झरी कार्स भाड्याने घेतलेल्या, तर दुबईत घराची माहितीही खोटी; एल्विश यादवच्या संपत्तीबाबत पालकांचा मोठा खुलासा, म्हणाले…

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya and avinash narkar shares holi dance video on holi song dvr