अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर हे दोघं गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अजूनही दोघं मालिका, नाटक, चित्रपट, वेब सीरिजमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यांच्या कामाबरोबर दोघं सोशल मीडियावर पोस्टमुळे अधिक चर्चेत असतात. ऐश्वर्या व अविनाश नारकरांचे डान्स व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात. अशातच त्यांच्या लेकाची गर्लफ्रेंड लवकरच ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा मुलगा अमेय नारकरला लहानपणापासून अभिनय व नृत्याची आवड आहे. रुईया महाविद्यालयातून त्याने बीएमएममधून (संज्ञापन आणि माध्यम विभाग) शिक्षण घेतलं आहे. यावेळी त्यानं बऱ्याच एकांकिका, नाटकात काम केलं आहे. गेल्यावर्षी त्यानं दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं. ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अमेयनं सांभाळली होती. आता अमेय नारकरच्या गर्लफ्रेंडची मराठी मालिकाविश्वात एन्ट्री होतं आहे.

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा आता ‘यांच्या’ हाती, आधी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे पती होते दिग्दर्शक

अमेय नारकरच्या गर्लफ्रेंडचं नाव ईशा संजय असून दोघं एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी अमेय व ईशाच्या एका डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या व्हिडीओत अमेयनं ईशाबरोबर ‘गोरी गौरी मांडवाखाली’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता.

आता अमेयची गर्लफ्रेंड ‘झी मराठी’च्या ‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेतील सूर्यादादाच्या चार बहिणींपैकी एका बहिणीच्या भूमिकेत ईशा दिसणार आहे. ईशा मालिकेत राजश्री ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये ईशाची झलक पाहायला मिळाली होती.

ईशा संजयने ललित कला केंद्रातून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. शिवाय ती भरतनाट्यम देखील शिकली आहे. तिनं अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे व्हिडीओ अमेय व अविनाश नारकरांनी लाइक केलेले पाहायला मिळत आहेत. तसंच ईशा व अमेयनं काही नाटकांमध्येही एकत्र काम केलं होतं. याचे व्हिडीओ देखील ईशाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिसत आहेत.

हेही वाचा – Video: लवकरच बंद होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील कलाकारांचा ‘अंगारों’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – नेपाळी थाळीवर ताव मारून मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे परतले मायदेशी, फोटो व्हायरल

दरम्यान, ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडची ‘लाखात एक आमचा दादा’ नवी मालिका कधीपासून सुरू होणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही. पण या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण व अभिनेत्री दिशा परदेश मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसंच ईशासह अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), ई तनपुरे (भाग्यश्री) या चार बहिणी पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya and avinash narkar son amey girlfriend play role in zee marathi lakhat ek amcha dada serial pps