Aishwarya Narkar Birthday : ‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘श्रीमंताघरची सून’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. छोट्या पडद्यावर त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. उत्तम अभिनयाप्रमाणेच ऐश्वर्या नारकर त्यांच्या फिटनेससाठी सुद्धा ओळखल्या जातात. नियमित योगा करून फिट राहण्याचा सल्ला त्या सर्व चाहत्यांना देत असतात. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीने नुकतीच वयाची पन्नाशी पूर्ण केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) यांचा जन्म ८ डिसेंबर १९७४ साली झाला. मध्यंतरी इन्स्टाग्राम ‘आस्क मी सेशन’मध्ये अभिनेत्रीने एका चाहत्याला वय आणि जन्मतारीख सांगितली होती. नुकताच त्यांनी आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला. याची खास झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दाखवली आहे. रविवारी वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या नारकरांवर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

हेही वाचा : जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्रीने ‘असा’ साजरा केला वाढदिवस

ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला त्या मालिकेच्या सेटवर केक कापत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर अभिनेत्रीला घरी तिचे पती अभिनेते अविनाश नारकर केक भरवत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. याशिवाय ऐश्वर्या यांनी वाढदिवसानिमित्त मिळालेल्या असंख्य गिफ्ट्सची झलक सुद्धा यामध्ये दाखवली आहे. अभिनेत्रीला कॉफीचे कप, डिझायनर काचेची बॉटल, ग्रिटींग कार्ड, फुलांचे गुच्छ अशा बऱ्याच भेटवस्तू मिळाल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर हा व्हिडीओ शेअर करत लिहितात, “माझा दिवस इतका सुंदर केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार. हे सगळे माझ्या आयुष्यातील फार सुंदर क्षण होते. मालिकेच्या टीमचे, तितीक्षा तावडे, अमृता रावराणे, श्वेता मेहेंदळे, एकता डांगर या सगळ्यांचे खूप आभार” तसेच कॅप्शनच्या शेवटी पती अविनाश यांना टॅग करत ऐश्वर्या यांनी त्यांचेही आभार मानले आहेत.

हेही वाचा : बॉलीवूडमध्ये काम नव्हतं, आईसमोर प्रचंड रडलो अन्…; विवेक ओबेरॉयचं संपूर्ण आयुष्य ‘त्या’ दिवसापासून बदललं, तो क्षण कोणता?

ऐश्वर्या नारकरांच्या ( Aishwarya Narkar ) वाढदिवसाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशिवाय त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेत मैथिली हे पात्र साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar 50th birthday celebration on shooting set shares glimpses sva 00