चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अनेकदा सेटवरची धमाल-मस्ती, डान्सचे व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. अभिनेत्रीचा असाच एक कातिल व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक

हेही वाचा… “मला रोज फोन करतायत”, केदार शिंदे करतात निलेश साबळेला दररोज फोन, म्हणाला…

ऐश्वर्या नारकर यांनी ‘गरम मसाला’ आणि ‘अदा’ या गाण्यावर एक ट्रान्झिशन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्या आधी लाल रंगाच्या ड्रेसवर दिसतायत; नंतर त्या काळ्या रंगाच्या साडीत आणि सफेद रंगाच्या स्लीवलेस ब्लाऊजमध्ये दिसतायत.

ऐश्वर्या नारकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. “Only अदा” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलंय. ऐश्वर्या नारकर यांच्या या अदावर चाहते घायाळ झालेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “मार ही डालोगी.” तर दुसऱ्याने लिहिलं, “अदा, तुमच्यावर सारे फिदा.. आप रहो फिट सदा…”

“सिर्फ अदा नहीं, कातिलाना अदा” असं तिसऱ्याने लिहिलं. “थांबा, नेत्राला पाठवतो विरोचकाची अदा बघायला”, अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली.

हेही वाचा… “एकापेक्षा एक नमुने…”, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रींचा कॉमेडी व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…

“कमाल”, “खराखुरा गरम मसाला”, “खूपच अप्रतिम सौंदर्य नी तितक्याच कातिल अदा”, “आप इतनी सुंदर हो, मैं क्या करू”, अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. काही तासातच या व्हिडीओला २३ हजारांपेक्षा जास्तीचे व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… ‘चला हवा येऊ द्या’नंतर भाऊ कदम यांनी नाकारली होती हिंदी कॉमेडी शोची ऑफर; किस्सा सांगत म्हणाले, “आपल्याला मराठीत जेवढा मान…”

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे, तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.

Story img Loader