अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची क्रेझ प्रदर्शना आधीच जबरदस्त पाहायला मिळत आहेत. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. २९ मेला प्रदर्शित झालेल्या ‘सूसेकी’ गाण्यांनी भुरळ प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना पडली आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने गायलेल्या या गाण्याला प्रदर्शित होऊन एक महिनाही पूर्ण झालेला नसून ४०, ६० मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. युट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून हे गाणं ट्रेंडमध्ये आहे. सहा भाषांमध्ये हे गाणं प्रदर्शित झालं असून सहाही भाषांमध्ये सुपरहिट झालं आहे.
‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्याचे अनेक फ्युजन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘सूसेकी’ गाणं आणि मराठी गाणं असे बरेच फ्युजन तयार करण्यात आले असून त्यावर कलाकार मंडळींसह सर्वजण डान्स करताना पाहायला मिळत आहेत. अशाच एका ‘सूसेकी’च्या फ्यूजनवर ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांनी जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ ऐश्वर्या नारकरांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा – हृतिक रोशनच्या ‘लक्ष्य’ला २० वर्षे पूर्ण; करिअरच्या शोधात भटकलेल्या तरुणाची कथा पुन्हा पाहता येणार मोठ्या पडद्यावर, कधीपासून जाणून घ्या…
या व्हिडीओत, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर ‘सूसेकी’ व ‘लाजरान साजरा मुखडा’ या फ्युजन गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या सुंदर डान्सने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. “कमाल”, “जोडी नंबर वन”, “तुम्ही तो बेस्ट आहात”, “अप्रतिम शब्दाशिवाय दुसरा शब्दचं नाही”, अशा चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस या व्हिडीओवर पडला आहे.
विशेष म्हणजे या व्हिडीओतील ऐश्वर्या नारकरांच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिव्हलेस ब्लाऊज, त्यावर हिरव्या रंगाची किनार असलेली काळ्या रंगाची साडी, केसात गजरा, कपाळावर मोठी टिकली, अशा सुंदर लूकमध्ये ऐश्वर्या नारकर पाहायला मिळत आहेत. अनेक जणांनी त्यांच्या लूकचं कौतुकही केलं आहे.
हेही वाचा – ‘रमा राघव’ मालिकेला रामराम करून केलं थाटामाटात लग्न, आता अभिनेत्री झळकली ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत
दरम्यान, अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. येत्या १५ ऑगस्टला नाही तर ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटासाठी प्रेक्षकांना सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd