आज सर्वजण धुळवडीच्या रंगात रंगताना दिसत आहेत. देशभरातील लोक धुळवड आनंदात, उत्साहाने साजरी करत आहेत. कलाकार मंडळी देखील धुळवडीच्या रंगात रंगून गेलेले पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आपल्या चाहत्यांना धुळवडीच्या शुभेच्छा देत आहेत.

नुकतंच लाडक्या नारकर जोडप्याने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओत, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी करताना दिसत आहे. शिवाय रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचं लोकप्रिय ‘धुवून टाक’ या गाण्यावर ऐश्वर्या व अविनाश नारकर थिरकताना पाहायला मिळत आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

हेही वाचा – Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या लेकाचा जबरदस्त डान्स पाहिलात का? कलाकार मंडळीही म्हणाले, “खतरनाक…”

नारकर जोडप्याचा हा व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहते ऐश्वर्या व अविनाश यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. “कमाल”, “होळीच्या शुभेच्छा”, “मस्त”, “बसं एवढं आयुष्यात एन्जॉय करता आलं पाहिजे,” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी नारकर जोडप्याच्या या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: आला होळीचा सण लय भारी…, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील आदित्य-सईचा रितेश-जिनिलीयाच्या गाण्यावर जबरदस्त डान्स

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे.

Story img Loader