३१ मेला प्रदर्शित झालेला ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे. शरण शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट संथ गतीने व्यवसाय करताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत. सोशल मीडियावर अनेकजण या गाण्यांवर डान्स करताना करताना दिसत आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप म्हणजेच नारकर जोडप्यांनी ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटातील रोमँटिक गाण्यावर डान्स केला आहे.

राजकुमार राव व जान्हवी कपूरच्या ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटातील ‘देखा तेनु पहली पहली बार’ या रोमँटिक गाण्याची अनेकांना भुरळी पडली आहे. शाहरुख खान, काजोलच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘शावा-शावा’ या गाण्याचं हे रीमेक आहे. गायक मोहम्मद फैजने ‘देखा तेनु पहली पहली बार’ गाणं गायलं आहे. या गाण्यावर ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांनी जबरदस्त डान्स केला आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक

हेही वाचा – ‘शुभविवाह’ मालिकेतून अचानक ‘या’ अभिनेत्याची एक्झिट, आता ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेता झळकला ‘या’ भूमिकेत

ऐश्वर्या नारकरांनी हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये दोघं ‘देखा तेनु पहली पहली बार’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत असून अविनाश नारकरांच्या एक्सप्रेशन्सने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. दोघांचा हा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: मुक्ता चॅलेंज करणार पूर्ण, सगळ्यांसमोर करणार सागरला किस, पाहा रोमँटिक सीन

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील कलाकारांचा गोविंदाच्या गाण्यावरील जबरदस्त डान्स, वल्लरी विराज म्हणाली, “वेडसर…”

विशेष म्हणजे या व्हिडीओतील ऐश्वर्या नारकरांच्या लूकने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिव्हलेस ब्लाऊज, त्यावर हिरव्या रंगाची किनार असलेली काळ्या रंगाची साडी, केसात गजरा, कपाळावर मोठी टिकली, अशा सुंदर लूकमध्ये ऐश्वर्या नारकर पाहायला मिळत आहेत. नारकर जोडप्याच्या या व्हिडीओला आतापर्यंत ६९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून २ हजारांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. तसंच चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

Story img Loader