Aishwarya Narkar and Avinash Narkar : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर ट्रेंड होतं असलेल्या गाण्यांवर डान्स व्हिडीओ करत असतात. जसं ऐश्वर्या व अविनाश यांच्या कामाचे चाहते आहेत, तसंच त्यांच्या डान्स व्हिडीओचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक नारकर जोडी आहे. नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी पंजाबी गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

‘हौली हौली’ असं कॅप्शन लिहित ऐश्वर्या नारकरांनी ( Aishwarya Narkar ) डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या अविनाश यांच्याबरोबर अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘खेल खेल में’मधील ‘हौली हौली’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी दोघं गाण्यातील जबरदस्त हूकस्टेप करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या एनर्जीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

हेही वाचा – Video: बायकोची माफी मागत प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ केला शेअर, स्वप्नील जोशी म्हणाला, “तुला भीती नाही का?”

तसंच व्हिडीओत ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) गुलाबी रंगाच्या कॉटन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. अविनाश नारकर हे फिकट गुलाबी रंगाचं शर्ट व त्यावर जीन्स या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. दोघांच्या या डान्स व्हिडीओवर पुन्हा एकदा चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्री एकता धनगरने लिहिलं आहे, “माझ्या माहितीतलं सर्वात तरुण जोडपं.” तसंच एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “जगातील सर्वात भारी जोडी.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “एकदम झकास.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अनिल कपूरसुद्धा तुमचे चाहते होतील.”

हेही वाचा – “तू माझ्या आयुष्यात अशा वेळी आलीस…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने होणारी बायको शिवानी सोनारसाठी लिहिली खास पोस्ट

…यामुळे ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा घेणार निरोप

दरम्यान, ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून एक्झिट होणार आहे. कथेनुसार विरोचकाचा वध होणार आहे. त्यामुळे ऐश्वर्या नारकरांच्या भूमिकेचा शेवट होणार आहे. अविनाश नारकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश यांचा ‘डंका हरी नामाचा’ चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अविनाश नारकरांसह अभिनेता अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, रसिका सुनिल, अक्षया गुरव झळकले आहेत. या चित्रपटातील गाणी सध्या चांगली चर्चेत आहेत.

Story img Loader