ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या जोडीच्या इन्स्टाग्राम रील्स नेहमी चर्चेत असतात. ट्रेडिंग गाण्यांवर हे जोडपं भन्नाट रील्स बनवीत असतात. ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे; जो सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाम मनसु या दाक्षिणात्य गाण्यावर या जोडप्यानं डान्स केला आहे. जबरदस्त डान्स स्टेप्स करीत या जोडप्यानं एकदम एनर्जेटिक परफॉर्मन्स दिला आहे. “आम्ही ट्रेंड फॉलो करीत आठवणी गोळा करतोय,” अशी सुंदर कॅप्शन ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे; तर अविनाश नारकर यांनी तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे.

नारकर दाम्पत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत आहेत. एकानं कमेंट करीत लिहिलं, “अविनाश सर तर जाम मज्जा करतात डान्स करताना.” तर दुसऱ्यानं लिहिलं, “प्रत्येक क्षण कसा आनंदात जगावा हे तुमच्याकडे पाहून शिकावं.” “किती आनंद लुटता तुम्ही जीवनाचा”, “असा माणूस पाहिजे जो जीवनाचा आनंद पुरेपूर लुटतो.” अशा प्रकारच्या कमेंट्सचा वर्षाव चाहत्यांनी या रीलवर केला आहे. “अविनाश काका, जाम भारी, जबरदस्त एकदम…” अशी मजेशीर कमेंट एकानं केली.

हेही वाचा… “मी रंगदेवतेची माफी…”, नाटकादरम्यान भार्गवी चिरमुलेने केली होती ‘ही’ चूक, म्हणाली…

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहेत; तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar and avinash narkar dance on south song reel viral dvr