मराठी कलाविश्वात ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या जोडीकडे एव्हरग्रीन कपल म्हणून पाहिलं जातं. या जोडप्याने ३ डिसेंबर १९९५ रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनीही अनेक गाजलेल्या मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या ही जोडी त्यांच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाण्यांवर हे दोघं भन्नाट डान्स करतात. मध्यंतरी या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या सगळ्या ट्रोलर्सला ऐश्वर्या नारकरांनी स्पष्ट उत्तर देत गप्प केलं होतं. अभिनय ते इन्स्टाग्राम रिल्स हा त्यांचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
इन्स्टाग्राम रिल्सबद्दल ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “सोशल मीडियाचा वापर आपण नेहमी सकारात्मकतेने वापर केला पाहिजे. आता लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हा त्यांचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाचं तोंड धरायला जाऊ शकत नाही. जेवढे चांगले लोक असतात तेवढेच विरुद्ध विचार करणारेही असतात. आपल्याला जे छान वाटतं ते नेहमी करत राहायचं.”
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लोकप्रिय मालिकेत जबरदस्त एंट्री; झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत
ऐश्वर्या आणि अविनाश नारकारांचे रिल्स शूट कसे होतात याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाल्या, “मला सोशल मीडिया पाहताना जी गाणी चांगली वाटतील त्यावर मी व्हिडीओ बनवते. पण, प्रत्येक व्हिडीओला काहीतरी वेगळं कॅप्शन देण्याचा माझा प्रयत्न असतो.”
अविनाश नारकर याविषयी सांगतात, प्रत्येक व्हिडीओमागे मेहनत खूप असते. कारण, शूटिंग संपवून आम्हाला हे व्हिडीओ बनवावे लागतात. आम्ही रात्री ११-११.३० वाजता घरी येऊन त्यानंतर फ्रेश होऊन व्हिडीओ बनवतो. पुढे, व्हिडीओसाठी आम्हाला साधारण दीड-पावणे दोन वाजतात.
हेही वाचा : सायलीच्या खोट्या गरोदरपणाचा कट कोणी रचला? ‘ठरलं तर मग’च्या नव्या भागात सत्य येणार समोर
दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या अविनाश नारकर ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांची भूमिका साकारत आहेत. तसेच ऐश्वर्या नारकर या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत.