९०च्या दशकांपासून अविरत प्रेक्षकांचं मनोरंजन करणार मराठीतलं लाडकं जोडप म्हणजे नारकर जोडप. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर यांनी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आपल्या दमदार अभिनयाने दोघांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पन्नाशी ओलांडली असली तरी दोघांमधील एनर्जी, फिटनेस तरुणाईला लाजेवल अशी आहे. सध्या दोघं सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरच्या रोमँटिक डान्स व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांनी अजय देवगणच्या ‘सिंघम’ चित्रपटातील ‘साथिया’ गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे. डान्सर सुभ्रनिल पॉलने ‘साथिया’ गाण्यावर सुंदर डान्स कोरियोग्राफ केला होता. तसाच ऐश्वर्या व अविनाश यांनी डान्स केला आहे. हा व्हिडीओ ऐश्वर्या यांनी सुभ्रनिल पॉलला टॅग करत लिहिलं आहे, ठतू हे अप्रतिम केलं आहे…तुझी प्रत्येक डान्स व्हिडीओ भारी असते. आम्ही डान्सर नाही आहोत. फक्त आमच्यापरीने चांगला डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे.”

हेही वाचा – Video: कुशल बद्रिकेनंतर ‘चला हवा येऊ द्या’मधील लोकप्रिय विनोदवीराची ‘मॅडनेस मचाएंगे’ हिंदी कार्यक्रमात एन्ट्री, व्हिडीओ आला समोर

या व्हिडीओत, ऐश्वर्या नारकर हूडी टी-शर्टमध्ये असून त्यांनी मोकळे केस सोडले आहेत. तर अविनाश नारकर निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. दोघांनी ‘साथिया’ या गाण्यावर रोमँटिक डान्स खूप सुंदर केला आहे. व्हिडीओमधील त्यांची केमिस्ट्री, बॉन्डिंग चाहत्यांना खूप आवडली आहे.

हेही वाचा – Video: मराठी अभिनेत्रीच्या आजीला ‘गुलाबी साडी’ गाण्याची पडली भुरळ; नटून-थटून केला भन्नाट डान्स

ऐश्वर्या व अविनाश यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. “शब्द हरवलेत सध्या सापडत नाहीयेत”, “तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनला आहात”, “एव्हरग्रीन लव्हबर्ड्स”, “तुम्ही दोघं खूप गोड आहात”, “अतिसुंदर”, “सुंदर जोडी”, “किती गोड”, “तुमचं नातं पाहून खूप भारी वाटतं”, “एकच नंबर…क्यूट कपल”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची झाली फसवणूक, संतप्त विदिशाने पोस्ट करत कलाकारांना केली ‘ही’ विनंती

ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या या व्हिडीओला लाखोंहून व्ह्यूज मिळाले आहेत. ९ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं असून २०० हून अधिक जणांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar and avinash narkar romantic dance on ajay devgan song sathiya pps