Aishwarya And Avinash Narkar Dance Video : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर यांनी आपल्या अभिनयाबरोबर डान्स कौशल्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. एव्हरग्रीन कपल असं ऐश्वर्या-अविनाश नारकरांना म्हटलं जातं. ५० वय ओलांडूनही त्यांची एनर्जी ही तरुणाईला लाजवेल अशी असते. त्यामुळे त्यांच्या डान्स व्हिडीओचं नेहमीच कौतुक होतं असतं. सध्या ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या रोमँटिक डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

ऐश्वर्या-अविनाश नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपले नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच सोशल मीडियावरील ट्रेंडदेखील फॉलो करत असतात. सध्या सोशल मीडियावरील युझर्स सुशांत सिंह राजपूत आणि अनुष्का शर्माचं ‘चार कदम’ गाण्यावर रील व्हिडीओ करताना दिसत आहेत. त्यामुळेच हे गाणं ट्रेंडमध्ये आहे. याच गाण्यावर ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी रोमँटिक डान्स केला आहे.

Gatha Navnathanchi and Chotya Bayochi Mothi Swapna sony marathi serial off air
दोन लोकप्रिय मालिकांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप, नेटकरी म्हणाले, “एवढ्या लवकर का संपवली?”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Vallari Viraj
Video: लीला, शिवा व सरूचा भन्नाट डान्स; वल्लरी विराजने शेअर केला व्हिडीओ, अभिनेत्रीच्या कमेंटने वेधले लक्ष
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Navri Mile Hitlarla
Video: “लीलासाठी स्पेशल…”, एजे-लीलामधील अंतर कमी होणार; मनातल्या गोष्टी ओठांवर येणार? पाहा प्रोमो
Drashti Dhami First Photo with Newborn Daughter
लग्नानंतर ९ वर्षांनी आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच शेअर केला गोंडस लेकीचा फोटो
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

हेही वाचा – Bigg Boss 18: “फक्त लूक आणि आवाजावर…”, सलमान खान-काम्या पंजाबीने विवियन डिसेनाची केली कानउघडणी, काय म्हणाले? जाणून घ्या…

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी रोमँटिक डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी हार्ट इमोजी कॅप्शनमध्ये दिले आहेत. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या-अविनाश नारकर ‘चार कदम’ गाण्यावर सुंदर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा हा रोमँटिक डान्स व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: अविनाश मिश्राला ‘स्त्रीलंपट’ म्हणण्यावरून सलमान खान भडकला, चाहत पांडेचा ‘तो’ फोटो दाखवत केली पोलखोल

ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या या डान्स व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘निखळ आनंदी जोडपं’, ‘मस्तच’, ‘अविनाश सर नेहमीच भारी नाचतात’, ‘तुम्ही दोघे खूप गोड आहात’, ‘मस्त जोडी…तुम्ही एकमेकांसाठीच बनला आहात’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया

दरम्यान, ऐश्वर्या-अविनाश नारकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच ऐश्वर्या यांची लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत त्यांनी साकारलेली खलनायिका चांगलीच गाजली. तसंच अविनाश नारकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेत त्यांनी विक्रमादित्य देशमुखची भूमिका साकारली आहे. याशिवाय त्यांचं ‘पुरुष’ नावाचं नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष ५० प्रयोग या नाटकाचे होणार आहेत.

Story img Loader