Aishwarya Narkar & Madhura Joshi Dance : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अंगारो सा’, ‘पीलिंग्स’, ‘किसिक’ ही गाणी गेल्या महिन्याभरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहेत. या गाण्यांची भुरळ सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटींना देखील पडल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडेच ऐश्वर्या नारकर व मधुरा जोशी या दोन अभिनेत्रींनी ‘किसिक’ या गाण्यावर जबरदस्त अंदाजात डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा’ चित्रपटाच्या पहिल्या भागातील समांथाच्या डान्स नंबरची संपूर्ण देशभरात चर्चा झाली होती. यानंतर दुसऱ्या भागात कोणती अभिनेत्री आयटम नंबर करणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ‘किसिक’ गाण्याची पहिली झलक समोर आल्यावर यामध्ये श्रीलीला आणि अल्लू अर्जुनची डान्सिंग केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. हे गाणं बघता-बघता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. याच गाण्याची भुरळ आता ऐश्वर्या नारकरांना ( Aishwarya Narkar ) देखील पडली आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी ५’ फेम निक्की तांबोळी ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार, सोबतीला असणार उषा नाडकर्णींसह प्रसिद्ध कलाकार

ऐश्वर्या नारकर व मधुरा जोशी यांचा सुंदर डान्स

‘किसिक’ गाण्यावर ऐश्वर्या नारकर या अभिनेत्री मधुरा जोशीबरोबर थिरकल्या आहेत. यावेळी या दोघींनी वेस्टर्न ड्रेस घातले होते. या गाण्यावर थिरकताना दोघींच्या चेहऱ्यावरचे हावभाव विशेष लक्षवेधी ठरले. मधुरा जोशीने हा व्हिडीओ शेअर करत याला, “ऐश्वर्या नारकरांबरोबर किसिक डान्स” असं कॅप्शन दिलं आहे.

ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) व मधुरा यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दोघींचाही डान्स एकदम सुंदर झाल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. ऐश्वर्या व मधुरा यांच्या ‘किसिक’ डान्सला अवघ्या २४ तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा : Allu Arjun : “फायर नहीं वाईल्ड फायर…” म्हणणारा ‘पुष्पा’ जेव्हा भावूक होतो, ‘त्या’ घटनेचा उल्लेख करताच अल्लू अर्जुनचा कंठ दाटला

हेही वाचा : Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…

दरम्यान, ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच त्यांच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर अभिनेत्री मधुरा जोशी लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या नव्या ‘तू हि रे माझा मितवा’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar and madhura joshi dances on pushpa 2 kissik song sva 00