Aishwarya Narkar : मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकरांकडे पाहिलं जातं. या जोडीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या दोघांची पहिली भेट एकत्र नाटकात काम करताना झाली होती. पुढे, दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. १९९५ मध्ये ऐश्वर्या म्हणजेच माहेरच्या पल्लवी आठल्ये आणि अविनाश नारकर यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) व अविनाश नारकर हे दोघंही जोडीने विविध ट्रेडिंग गाण्यांवर भन्नाट रील्स व्हिडीओ बनवत असतात. या दोघांच्या जबरदस्त डान्सची चर्चा तर, सर्वत्र रंगलेली असते. विशेषत: या जोडप्याच्या एनर्जीचं चाहते भरभरून कौतुक करतात. कारण, आजच्या घडीला तरुण पिढीला लाजवेल असा या जोडप्याने आपला फिटनेस जपला आहे. दररोज सकाळचे नारकर जोडप्याचे योगा करतानाचे व्हिडीओ सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतात. मात्र, सध्या अभिनेत्री एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
mp theft viral video
VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”

हेही वाचा : सलमान खानचा ३० वर्षे बॉडीगार्ड असलेल्या ‘शेरा’ची गोष्ट! त्याचं खरं नाव, वय माहितीये का? जाणून घ्या…

ऐश्वर्या नारकरांनी नेटकऱ्याला सुनावलं

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा या जोडप्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही युजर्स तर अत्यंत खालच्या दर्जाच्या किंवा चुकीच्या कमेंट्स त्यांच्या फोटो, व्हिडीओवर करतात. अशावेळी ऐश्वर्या या सगळ्या ट्रोलर्सना जिथल्या तिथे उत्तरं देतात. एवढंच नव्हे तर, संबंधित युजरने केलेल्या आक्षेपार्ह, चुकीच्या कमेंट्चे फोटो देखील अभिनेत्री थेट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करतात.

ऐश्वर्या नारकरांच्या ( Aishwarya Narkar ) एका व्हिडीओवर युजरने, “ते शिमग्यातलं सोंग कुठे आहे” अशी कमेंट केली आहे. नेहमी ऐश्वर्या या आपल्या पतीबरोबर डान्सचे व्हिडीओ शेअर करतात. मात्र, आता संबंधित व्हिडीओमध्ये अविनाश नारकर नसल्याने नेटकऱ्याने हा प्रश्न विचारला. या कमेंटचा स्क्रीनशॉट अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर करत संबंधित ट्रोलरला चांगलंच सुनावलं आहे. “स्वत:ची लायकी सिद्ध करताय का? भोसले नावाचं काहीतरी कर्तृत्व असूद्या!” अशी कमेंट करत अभिनेत्रीने या नेटकऱ्याला खडेबोल सुनावले आहेत.

हेही वाचा : Video : जडतो तो जीव…; पुरस्कार सोहळ्यात प्रिया बापटने गायलं २५ वर्षे जुन्या मालिकेचं अजरामर गीत, सर्वत्र होतंय कौतुक

Aishwarya Narkar
ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सला सुनावलं ( Aishwarya Narkar )

दरम्यान, ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.

Story img Loader