चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.

ऐश्वर्या नारकर समाजमाध्यमांवर कायम सक्रिय असतात. अनेकदा सेटवरच्या मेकअप रूममधली धम्माल-मस्ती, सहकलाकारांबरोबरचे डान्स व्हिडीओ त्या समाजमाध्यमावर शेअर करीत असतात. अनेकदा काही व्हिडीओजमुळे त्यांना ट्रोल करण्यात येत. अशा होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीने अनेकदा भाष्य केलं आहे आणि ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

हेही वाचा… रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याने सोशल मीडियावरून लग्नाचे फोटो डीलीट केल्यामुळे चर्चांना उधाण

नुकताच ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, अमृता रावराणे, एकता एक मजेशीर व्हिडीओ एकताने शेअर केला आहे. सध्या इंटरनेटवर एका कार्टून रुपी चेटकणीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याचं डायलॉगवर आता ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, एकता आणि अमृताने व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या नारकर आणि अमृता अभिनय करतायत तर एकता आणि तितीक्षा त्यांच्यासाठी डायलॉग बोलताना दिसतायत.

अभिनेत्रींचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओवर कलाकारांच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत तर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलदेखील केलं आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुमचं वय काय आणि तुम्ही करताय काय?” या ट्रोलिंगला उत्तर देत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “बोलण्यात ताकद वाया घालवू नका मजा करा. आयुष्य एकदाच मिळतं. ते पूर्ण जगा.”

हेही वाचा… ठरलं तर मग: “सरांच्या मनात माझ्याविषयी प्रेम…”, अर्जुनच्या प्रेमात पडलेली सायली होणार कुसुमसमोर व्यक्त; प्रोमो पाहून चाहते म्हणाले, “फालतूगिरी…”

अभिनेत्रीच्या या कमेंटवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीला सपोर्ट केला आहे. या ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “ज्यांनी असले अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ पाहिले नाहीत त्यांना तुम्ही काय करताय ते समजणार नाही. त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करा.”

हेही वाचा… ठरलं तर मग: …अन् अर्जुन चैतन्यच्या कानाखाली मारतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य साक्षीला सांगितल्यामुळे अर्जुनचा राग अनावर, पाहा प्रोमो

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे; तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही यात निर्णायक भूमिका आहेत.

Story img Loader