चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऐश्वर्या नारकर समाजमाध्यमांवर कायम सक्रिय असतात. अनेकदा सेटवरच्या मेकअप रूममधली धम्माल-मस्ती, सहकलाकारांबरोबरचे डान्स व्हिडीओ त्या समाजमाध्यमावर शेअर करीत असतात. अनेकदा काही व्हिडीओजमुळे त्यांना ट्रोल करण्यात येत. अशा होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीने अनेकदा भाष्य केलं आहे आणि ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
नुकताच ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, अमृता रावराणे, एकता एक मजेशीर व्हिडीओ एकताने शेअर केला आहे. सध्या इंटरनेटवर एका कार्टून रुपी चेटकणीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याचं डायलॉगवर आता ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, एकता आणि अमृताने व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या नारकर आणि अमृता अभिनय करतायत तर एकता आणि तितीक्षा त्यांच्यासाठी डायलॉग बोलताना दिसतायत.
अभिनेत्रींचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओवर कलाकारांच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत तर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलदेखील केलं आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुमचं वय काय आणि तुम्ही करताय काय?” या ट्रोलिंगला उत्तर देत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “बोलण्यात ताकद वाया घालवू नका मजा करा. आयुष्य एकदाच मिळतं. ते पूर्ण जगा.”
अभिनेत्रीच्या या कमेंटवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीला सपोर्ट केला आहे. या ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “ज्यांनी असले अॅनिमेटेड व्हिडीओ पाहिले नाहीत त्यांना तुम्ही काय करताय ते समजणार नाही. त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करा.”
दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे; तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही यात निर्णायक भूमिका आहेत.