मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजेच ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. गेल्या अनेक दशकांपासून अनेक नाटक, मालिका, चित्रपटांद्वारे ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.

दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या जोडीच्या इन्स्टाग्राम रील्स नेहमी व्हायरल होत असतात. या वयातही त्यांची भन्नाट एनर्जी पाहून चाहते थक्क होतात, तर काही जण त्यांना ट्रोलदेखील करतात. नुकताच या जोडीने एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या चर्चेत आहे.

an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Jahnavi Killekar And Nalinee Mumbaikar
जान्हवी किल्लेकर पोहोचली नलिनी काकूंच्या घरी! चुलीवर बनवलं ‘Banana Leaf पापलेट’, दोघींना एकत्र पाहून नेटकरी म्हणाले…
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल

हेही वाचा… शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, मुलगा लव सिन्हा म्हणाला, “गेल्या काही दिवसांपासून…”

“Kanmani Anbodu” या दाक्षिणात्य गाण्यावर दोघं थिरकले आहेत. जबरदस्त डान्स स्टेप्स करीत या जोडप्यानं चाहत्यांचं मन जिंकलंय. या डान्स व्हिडीओत ऐश्वर्या नारकर यांनी फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर ऑफ व्हाईट रंगाचं डिझायनर ब्लाऊज अभिनेत्रीने घातलं आहे. अविनाश नारकरांनी प्रिंटेड ऑफ व्हाईट शर्ट तर निळ्या रंगाची जीन्स घातल्याच या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. अविनाश नारकर यांनी काळ्या रंगाचा गॉगल लावून त्यांचा लूक पूर्ण केलाय. “आम्ही ट्रेंड फॉलो करतोय” असं कॅप्शन ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

नारकर दाम्पत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “खूप छान सर आणि मॅडम” तर दुसर्‍या चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “माझा आवडता डान्स आहे हा पण काय जबरदस्त केला तुम्ही.. आम्हालाही जमणार नाही.. दोघंही खूप सुंदर दिसताय” तर एकजण कमेंट करत म्हणाला, “जबरदस्त एनर्जी आहे तुमची” तर एका नेटकऱ्याने “नका करत जाऊ, नाही पाहवत” अशी कमेंट केली.

हेही वाचा… Virat Kohli T20 Retirement: विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा करताच बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त; रणवीर सिंगसह ‘या’ कलाकारांच्या सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहेत; तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.

Story img Loader