मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजेच ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. गेल्या अनेक दशकांपासून अनेक नाटक, मालिका, चित्रपटांद्वारे ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.
दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या जोडीच्या इन्स्टाग्राम रील्स नेहमी व्हायरल होत असतात. या वयातही त्यांची भन्नाट एनर्जी पाहून चाहते थक्क होतात, तर काही जण त्यांना ट्रोलदेखील करतात. नुकताच या जोडीने एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या चर्चेत आहे.
हेही वाचा… शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, मुलगा लव सिन्हा म्हणाला, “गेल्या काही दिवसांपासून…”
“Kanmani Anbodu” या दाक्षिणात्य गाण्यावर दोघं थिरकले आहेत. जबरदस्त डान्स स्टेप्स करीत या जोडप्यानं चाहत्यांचं मन जिंकलंय. या डान्स व्हिडीओत ऐश्वर्या नारकर यांनी फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर ऑफ व्हाईट रंगाचं डिझायनर ब्लाऊज अभिनेत्रीने घातलं आहे. अविनाश नारकरांनी प्रिंटेड ऑफ व्हाईट शर्ट तर निळ्या रंगाची जीन्स घातल्याच या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. अविनाश नारकर यांनी काळ्या रंगाचा गॉगल लावून त्यांचा लूक पूर्ण केलाय. “आम्ही ट्रेंड फॉलो करतोय” असं कॅप्शन ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
नारकर दाम्पत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “खूप छान सर आणि मॅडम” तर दुसर्या चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “माझा आवडता डान्स आहे हा पण काय जबरदस्त केला तुम्ही.. आम्हालाही जमणार नाही.. दोघंही खूप सुंदर दिसताय” तर एकजण कमेंट करत म्हणाला, “जबरदस्त एनर्जी आहे तुमची” तर एका नेटकऱ्याने “नका करत जाऊ, नाही पाहवत” अशी कमेंट केली.
दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहेत; तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd