मराठी सिनेसृष्टीतलं एव्हरग्रीन कपल ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर सध्या चर्चेत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून अनेक नाटक, मालिका, चित्रपटांद्वारे ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांना बेस्ट कपल म्हणून इंडस्ट्रीत ओळखलं जात. दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि या जोडीच्या इन्स्टाग्राम रिल्स कायम चर्चेत असतात. या वयातही त्यांची भन्नाट एनर्जी पाहून चाहते थक्क होतात, तर काही जण त्यांना ट्रोलदेखील करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता या कपलने आता (Picchiga Nacchesave) या तेलुगू गाण्यावर हटके डान्स केला आहे. साउथ स्टार विजय देवरकोंडाचा भाऊ आनंद देवरकोंडा याच्या चित्रपटातील हे गाणं आहे. हटके डान्स स्टेप करत दोघांनी सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर केलाय. या डान्ससाठी ऐश्वर्या नारकर यांनी नक्षीकाम असलेली अशी सुंदर साडी नेसली आहे. तर अविनाश नारकरांनी बायकोच्या साडीला मॅचिंग असं साजेसं शर्ट परिधान केलं आहे. हे गाण सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. अनेक इन्फ्लुएंसर्स आणि कलाकार या गाण्यावर रील्स बनवत आहेत.

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दोघांच्या चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “तुम्ही सर्वात सुंदर कपल आहात.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “यांची एनर्जी तर बघा.” तिसऱ्याने “काकाच जास्त एन्जॉय करतायत” अशी कमेंट केली.

हेही वाचा… ठरलं तर मग: पूर्णाआजीला सायलीमध्ये दिसणार प्रतिमाचं रूप! मालिकेत येणार नवा ट्विस्ट, पाहा प्रोमो

एका युजरने “एव्हरग्रीन कपल” अशी कमेंट केलीय. तर “लय भारी”, ” तुम्ही खूप मस्त डान्स केलाय”, “किती सुंदर जोडी” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. अवघ्या दोन तासांतच या व्हिडीओला २५ हजारापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

“अवघ्या १५ सेकंदात अनंत शक्यता…. ट्रेंडिंग…” असं कॅप्शन ऐश्वर्या यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… २६ वर्षांपूर्वीच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर थिरकली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब; डान्सर रुपेश बनेने दिली साथ, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत; तर सन मराठी वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत अविनाश नारकर शेवटचे झळकले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar avinash narkar dance reel on telugu trending song viral video dvr