सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्याचा उपयोग व्यक्त होण्याबरोबरच मनोरंजनासाठीदेखील होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्यांबरोबर व्यक्ती जोडली जाते. सामान्य लोकांसह प्रसिद्ध व्यक्तीही या माध्यमाचा विविध कारणांसाठी वापर करतात. अनेकदा यावर विविध वस्तू, कपड्यांची जाहिरात केली जाते. कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार त्यांच्या कलाकृतींसह सोशल मीडियावरदेखील सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर काही फोटो, काही व्हिडीओ शेअर करतात. अनेकदा डान्सचे व्हिडीओदेखील हे कलाकार शेअर करीत असतात. विशेष बाब म्हणजे चाहतेदेखील कलाकारांच्या विविध व्हिडीओंवर त्यांची पसंती दर्शविताना दिसतात. आता अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा अश्विनी कासारसह डान्स

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्याबरोबर पती अविनाश नारकर व अभिनेत्री अश्विनी कासारदेखील दिसत आहेत. कौन दिसा में या गाण्यावर कलाकारांनी ताल धरला आहे. त्यांचे हावभाव लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्या नारकर व अश्विनी कासार दोघींनीही छान साड्या नेसल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा व्हिडीओ निसर्गाच्या सान्निध्यात शूट केल्याचे पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर व अश्विनी कासार ज्या ठिकाणी उभे आहेत, त्यांच्या पाठीमागे पाणी व बाजूला गर्द झाडी दिसत आहे. ऐश्वर्या नारकर यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अश्विनीने कमेंट करीत, त्यावर तुम्ही दोघे माझी आनंदी जागा आहात, असे म्हटले आहे. तर, अनेकांनी चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.

ऐश्वर्या नारकर अनेकदा त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. त्याबरोबरच सोशल मीडियावरील व्हिडीओंमुळेदेखील त्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. नुकत्याच त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये काम करताना दिसल्या होत्या. त्यांनी सकारात्मक व नकारात्मक दोन्ही भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता त्या कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अविनाश नारकर सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.