मराठी सिनेसृष्टीत अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं जोडपं म्हणजेच ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून दोघांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या जोडीच्या इन्स्टाग्राम रिल्स कायम चर्चेत असतात. या वयातही त्यांची भन्नाट एनर्जी पाहून चाहते थक्क होतात, तर काही जण त्यांना ट्रोलदेखील करतात.
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, जो सध्या चर्चेत आहे. ‘लापता लेडिज’या चित्रपटातल्या ‘सजनी रे’ या गाण्यावर अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडीओ बनवला आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. अनेक कलाकार, इन्फ्लुएंसर्सदेखील या गाण्यावर रिल्स करताना दिसतायत. अशातच मराठमोळं लोकप्रिय कपल अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर कसे मागे राहतील. त्यांनीदेखील या गाण्यावर क्षण जपणारा व्हिडीओ शेअर केलाय.
हेही वाचा… VIDEO: लंडनमध्ये पतीबरोबर फिरताना व्हिडीओ काढणाऱ्यावर भडकली कतरिना कैफ, नेटकरी म्हणाले…
सध्या नारकर कपल सुट्टयांचा आनंद घेत आहेत. निसर्गरम्य वातावरणात ते त्यांचा वेळ एकमेकांबरोबर घालवतायत. त्याचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण, आता हा व्हिडीओ शेअर करून त्यांनी चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. या व्हिडीओत अविनाश नारकर एका झोपाळ्यावर आपल्या विचारात मग्न दिसत आहेत. पुढे या व्हिडीओत अविनाश आणि ऐश्वर्या नदीच्या काठी शांततेत बसून गप्पांचा आनंद घेताना दिसतायत.
“आम्ही काय बोलतोय हे ओळखा पाहू”, असं कॅप्शन ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला दिलंय. तर्कवितर्क लावून चाहत्यांनीदेखील ते नेमकं काय बोलतायत याचं उत्तर कमेंट्समध्ये दिलं आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “लहानपणीच्या आठवणी सांगत आहेत”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुमच्या संवादावरून जाणवतंय की तुम्ही किती चांगल्या रिलेशनमध्ये आहात.”
एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एकत्र घालवलेल्या आठवणी असतील”; तर एकाने म्हटलं, “आपण थोडं लवकर यायला हव होतं ह्या जागी, किती छान जागा आहे. फोनमध्ये बघून सांगत असावेत की ही साडी छान दिसते तुला.”
दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत; तर सन मराठी वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत अविनाश नारकर शेवटचे झळकले होते.