Aishwarya Narkar Dance Video : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या कामाव्यतिरिक्त डान्स व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असतात. ऐश्वर्या यांचे प्रत्येक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. नुकताच त्यांनी एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून एक्झिट झाल्याचं म्हटलं जात होतं. पण आता मालिकेत ऐश्वर्या यांची नव्या भूमिकेतून एन्ट्री झाली आहे. डॉ. मैथिली सेनगुप्ता या भूमिकेत त्या झळकल्या आहेत. या मैथिलीमध्ये शतग्रीव नावाच्या असूराने प्रवेश केल्याच दाखवलं आहे. विरोचकाच्या वधाचा बदला घेण्यासाठी शतग्रीव कोलकाता येथून महाराष्ट्राच्या दिशेने निघाला आहे. त्यामुळे आता नेत्राला विरोचकानंतर शतग्रीवचा सामना करावा लागणार आहे. अलीकडेच आलेल्या प्रोमोमध्ये बंगाली साडी नेसून गुलाल उधळत शतग्रीवच्या रुपात ऐश्वर्या नारकर दिसल्या. ऐश्वर्या यांनी याच शतग्रीवच्या लूकमध्ये तमिळ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
‘रायन’ चित्रपटातील ए. आर. रेहमान यांचं ‘वॉटर पॅकेट’ गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. याच ट्रेंडला फॉलो करत ऐश्वर्या यांनी शतग्रीवरच्या लूकमध्ये ‘वॉटर पॅकेट’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
ऐश्वर्या नारकरांच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. ‘क्या बात है’, ‘खूप सुंदर’, ‘खूप सुंदर दिसताय’, ‘तुमची एनर्जी कमाल आहे’, ‘सुपर लूक’, ‘व्वा’, ‘कडक’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.
दरम्यान, याआधी ऐश्वर्या नारकर यांचे अविनाश नारकरांबरोबरचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी दोघांनी पंजाबी गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. यावेळी ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या एनर्जीचं नेटकऱ्यांकडून कौतुक करण्यात आलं होतं.