Aishwarya Narkar Video: मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या रील्समुळे अनेकदा चर्चेत असतात. चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.
हेही वाचा… ऐश्वर्या नारकर यांचा साडीतला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; चाहते म्हणाले, “अदा, तुमच्यावर सारे फिदा…”
ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar Video) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अनेकदा सेटवरची धमाल-मस्ती, सहकलाकारांबरोबर केलेले डान्स व्हिडीओ त्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अभिनेत्रीचा असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. मालिकेतील रुपाली-केतकीची ऑनस्क्रिन बॉन्डिंग जरी वेगळी असली तरी ऑफस्क्रिन दोघी धम्माल करताना दिसतात. दोघींनी असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ऐश्वर्या नारकर यांचा डान्स व्हिडीओ (Aishwarya Narkar Video)
ऐश्वर्या राय बच्चन अभिनीत ‘ताल’ चित्रपटातील “कहीं आग लगे लग जावे” या गाण्यावर दोघी थिरकल्या आहेत. या व्हिडीओत दोघींनी अभिनय आणि डान्स करत मजेशीर रील केली आहे. “ठरवलं होतं एक झालं भलतंच” असं कॅप्शन या व्हिडीओला ऐश्वर्या नारकर यांनी दिलं आहे.
ऐश्वर्या-अमृताचा (Aishwarya Narkar Video) हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “अहो तुमचा नवरा माझा नवसाचा कुठे आहे, त्याला पण घ्यायचं ना. मिल बैठे तीन यार” असं झालं असतं. तर दुसऱ्याने “खूप छान व्हिडीओ झाला आहे”, अशी कमेंट केली आहे. अनेकांनी हार्टचे इमोजी वापरत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/comments-aishwarya-narkar.png)
दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे, तर अजिंक्य ननावरे, अमृता रावराणे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.