सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या मराठी अभिनेत्रींपैकी एक ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) आहेत. त्यांचे सुंदर फोटो, डान्स व्हिडीओ हे कायम चर्चेत असतात. ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावरील ट्रेंड सतत फॉलो करताना दिसतात. ट्रेंडनुसार त्या डान्स व्हिडीओ करत असतात. अलीकडेच ऐश्वर्या यांनी कोल्हापुरी हलगीवर अभिनेत्री तितीक्षा तावडेबरोबर जबरदस्त डान्स केला होता. दोघींचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर अजूनही तुफान व्हायरल होत आहे. यामधील ऐश्वर्या व तितीक्षाच्या डान्सचं नेटकरी कौतुक करत आहेत. अशातच ऐश्वर्या यांनी आणखी एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या डान्स व्हिडीओमधील अभिनेत्रींच्या एक्स्प्रेशनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांनी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील केतकी राजाध्यक्ष म्हणजे अभिनेत्री अमृता रावराणेबरोबर डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या व अमृता आमिर खान व करिश्मा कपूर यांच्या ‘राजा हिंदुस्थानी’ चित्रपटातील ‘पूछो जरा पूछो’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघींनी या गाण्यावर सुंदर एक्स्प्रेशन दिले आहेत. त्यामुळे चाहते देखील कौतुक करत आहेत.

हेही वाचा – अभिज्ञा भावेने नेसली आजीची साडी, फोटो शेअर करत लिहिली भावुक पोस्ट, म्हणाली, “वर्षभरानंतरही…”

“खूप मस्त”, “खूप छान जोडी”, “मस्त”, “जबरदस्त”, “लय भारी”, “मस्त डान्स केला आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) व अमृता रावराणे यांच्या डान्स व्हिडीओवर दिल्या आहेत. दोघींचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

ऐश्वर्या नारकर व अमृता रावराणे यांचा पाहा डान्स

हेही वाचा – “आज जर तुम्ही असता तर…”, लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावर आनंद दिघेंची आठवण काढत मराठी अभिनेत्याची उद्विग्न पोस्ट

दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून एक्झिट झाल्याचं म्हटलं जात होतं. पण या मालिकेत काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या यांची नव्या भूमिकेतून जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळाली. डॉ. मैथिली सेनगुप्ता या भूमिकेत त्या झळकल्या आहेत. या मैथिली सेनागुप्तामध्येच शतग्रीव नावाच्या असूराने प्रवेश केल्याच दाखवलं आहे. विरोचकाच्या वधाचा बदला घेण्यासाठी शतग्रीव कोलकातातून महाराष्ट्रात आला आहे. तसंच त्याने नेत्राच्या घरात प्रवेश देखील केला आहे. त्यामुळे आता नेत्राला विरोचकानंतर शतग्रीवचा सामना करावा लागणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar dance with amruta raorane on aamir khan and karisma kapoor song pps