Aishwarya Narkar Avinash Narkar Dance Video: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. या जोडप्याचे ट्रेंडिंग गाण्यावरील रील्स चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असतात. त्याचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता या दोघांनी एक नवीन व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत फक्त ऐश्वर्या व अविनाश नाही तर आणखी एक सदस्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या व अविनाश नारकर दोघेही अचानक त्यांच्या वडिलांसमोर डान्स करू लागतात. दोघेही त्यांच्याबरोबर प्रँक करायचं ठरवतात, मात्र घडतं उलट. ऐश्वर्या यांचे बाबा या दोघांचा डान्स एंजॉय करू लागतात. ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा – “दोन्ही वर्षी पुरस्कार मिळाला नाही, थोडं हिरमुसल्यासारखं…”, ऐश्वर्या नारकरांनी हुकलेल्या अवॉर्डवर मांडलं मत, म्हणाल्या…

व्हिडीओत दिसतंय की ऐश्वर्या नारकर यांचे वडील खूर्चीवर बसले आहेत आणि तिथे जवळच अविनाश नारकर बसलेले आहेत. ऐश्वर्या अविनाश यांना हात पकडून वडिलांसमोर आणतात आणि मग ते दोघेही ‘हारा हारा’ या मल्याळम गाण्यावर डान्स करू लागतात. दोघांचा डान्स पाहून ते हसू लागतात. अविनाश नारकर त्यांच्या जवळ गेल्यावर ते त्यांना टाळी देऊन डान्स एंजॉय करतात.

हेही वाचा : मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो

‘बाबा इज लव्ह’ असं व्हिडीओवर लिहून ऐश्वर्या यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. “मस्ती आमच्या genes मध्ये आहे. त्यांच्याबरोबर प्रँक करण्याचा प्रयत्न केला पण ते मस्त एंजॉय करू लागले,” असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे.

पाहा व्हिडीओ –

ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ”खूपच भारी, तुम्ही पण त्यांच्या बरोबर आता परत बालपणाची फीलिंग एन्जॉय करताय. कारण म्हातारपण म्हणजे दुसर बालपण. खरंच खूप भारी वाटलं. मला माझ्या आजीची आठवण झाली”, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

ऐश्वर्या नारकर यांच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

तितिक्षा तावडेने ‘गोड’ अशी कमेंट केली आहे. तर अश्विनी कासारने भारी अशी कमेंट केली आहे. या व्हिडीओवर तितिक्षाचा पती सिद्धार्थ बोडकेने ‘खूप गोड’ लिहून रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar dance with avinash narkar in front of old father reaction viral titeeksha tawade comment on video hrc