Aishwarya Narkar : सध्या सोशल मीडियावर जुन्या गाण्यांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. रॅप आणि उडत्या गाण्यांच्या जमान्यात आजची तरुणाई मन शांत करण्यासाठी जुनी, शांत आणि संयमी गाणी ऐकण्यास प्राधान्य देते. बॉलीवूडच्या ७०-८० च्या दशकातील अनेक गाणी सध्या इन्स्टाग्राम रील्सवर ट्रेंड होत आहेत. किशोर कुमार यांचं ‘मुन्ना बड़ा प्यारा’ असो किंवा ‘मन तळ्यात मळ्यात’ हे मराठी गाणं…; गेल्या काही दिवसात नेटकऱ्यांना या गाण्यांची चांगलीच भुरळ पडल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विविध ट्रेडिंग गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवत त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. ऐश्वर्या व त्यांचे पती अविनाश यांचे एकत्र डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. अलीकडे ऐश्वर्या नारकर यांनी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या साथीने जुन्या गाण्यावर खास व्हिडीओ बनवला आहे.

Vallari Viraj
Video: लीला, शिवा व सरूचा भन्नाट डान्स; वल्लरी विराजने शेअर केला व्हिडीओ, अभिनेत्रीच्या कमेंटने वेधले लक्ष
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Navri Mile Hitlarla
लवकरच लीला-एजे हटके लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला; त्यांचा नवीन अवतार पाहताच नेटकरी म्हणाले, “आमचे पुष्पा-श्रीवल्ली…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Sunil Gavaskar Big Statement on Team India Test Series Defeat Against Australia Rohit Sharma IND vs AUS bdg 99
IND vs AUS: “आम्ही कोण? आम्हाला क्रिकेट थोडंच येतं…”, सुनील गावस्कर भारताच्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मावर संतापले?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Tere Naam Actress Bhumika Chawla
Video : सलमान खानच्या ‘तेरे नाम’ चित्रपटाची हिरोईन २१ वर्षांनंतर ‘अशी’ दिसते; पतीसह साध्या लूकमध्ये दिसली भूमिका चावला

हेही वाचा : Video : सलमान खानच्या ‘तेरे नाम’ चित्रपटाची हिरोईन २१ वर्षांनंतर ‘अशी’ दिसते; पतीसह साध्या लूकमध्ये दिसली भूमिका चावला

ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर अविनाश यांची खास कमेंट

ऐश्वर्या नारकरांनी ( Aishwarya Narkar ) दिग्गज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या ५६ वर्षांपूर्वीच्या ‘कजरा मोहब्बत वाला’ गाण्यावर खास ‘ब्लॅक अँड व्हाइट’ व्हिडीओ शेअर केला आहे. ‘कजरा मोहब्बत वाला’ हे गाणं १९६९ च्या ‘किस्मत’ चित्रपटातील आहे. या जुन्या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे.

ऐश्वर्या नारकरांनी अभिनेत्री अश्विनी कासार हिच्यासह या ‘कजरा मोहब्बत वाला’ गाण्यावर सुंदर असा डान्स केला आहे. व्हिडीओत दोघींची एनर्जी, दिलखेचक अदा लक्ष वेधून घेतात. अविनाश नारकरांनी या व्हिडीओवर “व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा….क्या बात है…!! खूप खूप खूप गोड….!!” अशी कमेंट केली आहे. तर, अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा या दोघींचं भरभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”

हेही वाचा : माधुरी दीक्षितच्या २४ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीचा डान्स! बहिणीच्या लग्नात लगावले ठुमके, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या ( Aishwarya Narkar ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘झी मराठी’च्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता अभिनेत्री येत्या काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader