मराठी कलाविश्वातील सगळेच कलाकार अलीकडच्या काळात सोशल मीडियावर सक्रिय असतात. ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची एव्हरग्रीन जोडी त्यांच्या इन्स्टाग्राम रील्समुळे कायम चर्चेत असते. बॉलीवूड आणि मराठी कलाविश्वातील ट्रेडिंग किंवा जुन्या गाण्यावर हे दोघेही भन्नाट व्हिडीओ बनवतात. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
ऑगस्ट २००१ मध्ये बॉलीवूडमध्ये ‘लज्जा’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र “बडी मुश्किल…” या गाण्याची चर्चा रंगली होती. बॉलीवूडमध्ये हे गाणं अजरामर ठरलं. याशिवाय माधुरी दीक्षित व मनीषा कोइरालाचा अप्रतिम डान्स, सुंदर हावभाव पाहून सगळेच घायाळ झाले होते. आज २२ वर्षांनी देखील हे गाणं प्रत्येक समारंभात वाजवलं जातं. याच लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी खास व्हिडीओ बनवला आहे.
अश्विनी कासार व ऐश्वर्या नारकरांनी साडी नेसून या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. ऐश्वर्या यांनी चॉकलेटी रंगाची चौकट साडी, तर अश्विनीने मेहंदी कलरची साडी नेसल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दोघींनीही या गाण्याला साजेशा अशा डान्स स्टेप्स केल्या आहेत.
हेही वाचा : “श्रेयसची चौकशी करण्यासाठी अक्षय कुमारने रात्रभर…”, दीप्ती तळपदेने केला खुलासा; म्हणाली, “त्या काळात…”
सध्या ऐश्वर्या नारकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहे. त्यांचे पती अविनाश नारकर यांनी लव्ह इमोजी शेअर करत या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील जुन्या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट रील बनवल्याने ऐश्वर्या व अश्विनी या दोन्ही अभिनेत्रींचं कौतुक केलं आहे. “मॅडम खूप सुंदर”, “आम्हाला पण तुमच्याबरोबर रील्स बनवण्याची इच्छा आहे”, “जुन्या गाण्यांवर मस्तच व्हिडीओ बनवता” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहे.