Aishwarya Narkar : गेली कित्येक वर्ष ऐश्वर्या नारकरांनी छोट्या पडद्यावर आपलं अधिराज्य गाजवलं आहे. सध्या त्या अभिनयाच्या जोडीने सोशल मीडियावरील व्हायरल गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवत असतात. ऐश्वर्या व त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांचे डान्स व्हिडीओ देखील सर्वत्र तुफान व्हायरल होत असतात. मराठी कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. पण, अनेकदा या जोडप्याला सोशल मीडिया ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतीच ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सोशल मीडियावरचं ट्रोलिंग ही एक प्रकारची विकृती असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय एखाद्या रील्स व्हिडीओवर नेटकरी कशाप्रकारे आपल्या भयंकर प्रतिक्रिया देतात याचा अनुभव सुद्धा यावेळी अभिनेत्रीने सांगितला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : १४ फ्लॉप चित्रपट अन् राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याच्या आजोबांनी भारतीय सैन्यासाठी डिझाइन केली होती पहिली तोफ

ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “सोशल मीडिया ट्रोलिंग विरोधात मी गप्प बसत नाही. मला राग येतो आणि मी खूप बोलते. कारण, कोणीही कोणाला गृहीत धरणं चुकीचं आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यावर आपला हक्क कधीच नसतो. या ट्रोलिंगमध्ये बायका सुद्धा खूप असतात, याचं वाईट वाटतं. मला असं खूप वाटतं की, एका बाईने दुसऱ्या बाईला सपोर्ट केला पाहिजे. पण, असं होत नाही. मी मध्यंतरी एक रील व्हिडीओ टाकला होता. त्या व्हिडीओमध्ये मी सत्यनारायण पूजेला स्लिव्हलेस ब्लाउज घालून बसले होते. त्याच्यावरून सुद्धा बोललं गेलं.”

हेही वाचा : “प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”

“त्या स्लिव्हलेस ब्लाऊजवरून मला इतक्या शिव्या घातल्या की, मला असं झालं यांच्या घरातल्या लेकी-सुनांचं काय होत असेल. आधीच्या काळात स्त्रियांनी कंचुकी वापरल्यात ना…तेव्हाची ती गरज होती आता फक्त त्याऐवजी स्लिव्हलेस ब्लाऊजची स्टाइल एक फॅशन म्हणून आलीये. मग त्यावरून पण बोलणार का? अरे काय हे?, हीच का आपली मराठी संस्कृती, काय ते दंड दाखवायचे… जे कोणी काही कपडे घालत असतील तो त्यांचा वैयक्तिक चॉईस आहे. ही एक प्रकारची विकृती आहे आणि हे थांबलं पाहिजे. कारण, सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे. यातून खूप चांगल्या गोष्टी जनरेट होतात. पण, या माध्यमांचा खूप घाणेरड्या पद्धतीने वापर केला जातो. ही खरंच विकृती आहे.” असं ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं.

Story img Loader