‘या सुखांनो या’, ‘लेक माझी लाडकी’, ‘स्वामिनी’ या मालिकेमुळे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर घराघरांत लोकप्रिय झाल्या. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयक्षेत्राशिवाय त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांचे फिटनेस व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सर्वाधिक चर्चेत असतात.

ऐश्वर्या यांनी नुकताच घरगुती जेवण बनवतानाचा खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांना वरण-भात, भाजी-भाकरी, ताक असे सगळे सात्विक पदार्थ बनवले होते. ऐश्वर्या नारकरांच्या या व्हिडीओवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. यापैकी त्यांच्या एका चाहतीने या व्हिडीओवर कमेंट करत अभिनेत्रीला खास सल्ला दिला होता.

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

हेही वाचा : तारीख ठरली! प्रथमेश परब ‘या’ दिवशी करणार साखरपुडा; म्हणाला, “आमच्या रिलेशनशिपमध्ये…”

ऐश्वर्या नारकर यांच्या व्हिडीओवर कमेंट करत चाहती लिहिते, “ताई सॉरी पण हे जे तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजताय त्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. प्लीज तुम्ही तुमची काळजी घ्या. कारण, मला तुम्ही खूप आवडता.” या कमेंटवर उत्तर देत अभिनेत्री म्हणते, “हो नक्कीच यापुढे मी काळजी घेईल धन्यवाद!”

हेही वाचा : “तुझं खूप देणं लागतो…” म्हणत कुशल बद्रिकेची बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट

aishwarya narkar
ऐश्वर्या नारकर

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत.

Story img Loader