Aishwarya Narkar : अभिनय क्षेत्रातील करिअर असो, सोशल मीडिया रील्स, योगा असो किंवा घर सांभाळणं एकंदर संसाराच्या सगळ्या बाजू उत्तमप्रकारे सांभाळत ऐश्वर्या नारकरांनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. एकत्र कुटुंबात राहिल्याने सिनेविश्वात काम करणं अधिक सोयीचं झालं, सासरी देखील उत्तम पाठिंबा मिळाला असं अभिनेत्रीने नुकत्याच ‘आरपार’ युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

ऐश्वर्या व अविनाश नारकर हे दोघंही सिनेविश्वात सक्रिय आहेत. त्यामुळे, पैशांचं नियोजन कसं केलं याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणतात, “हे क्षेत्र पैशांच्या बाबतीत खूप अस्थिर आहे. पण, मला असं वाटतं की आम्ही अगदी सुरुवातीपासून नियोजन केलं होतं. जेव्हा घर घ्यायचं असं आमचं ठरलं, तेव्हा आम्ही दोघांनी वर्षाला दोन लाखांच्या आसपास पैसे जमवले होते. तेव्हा आम्ही ठरवलं होतं की, आपल्याकडे एवढीच रक्कम आहे ना… मग त्याहून कमी पैशात सगळं बघायचं, तेवढ्यात भागवायचं आमची लाइफस्टाइल मर्यादीत ठेवली. त्यामुळे कधीच जास्तीचा पैसा आम्ही खर्च केला नाही. पैशांची बचत करण्यावर भर दिला.”

हेही वाचा : लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “सुरुवातीच्या काळात कधी मला काम नसेल, कधी त्याला काम नसेल… तरी आमचे सेव्हिंग्जमध्ये पैसे असायचे. जरी १५ माणसं आमच्यावर अवलंबून असली तरी आम्ही त्याचं योग्य पद्धतीने नियोजन करायचो. त्यानंतर मग मी हिंदी मालिका केल्या. पुन्हा मराठीत आल्यावर बऱ्यापैकी मानधन मिळालं. एक काळ गेल्यावर चांगलं मानधन मिळू लागलं, मग आमच्यात तो कम्फर्ट झोन आला. त्यावेळी सुद्धा आम्ही लाइफस्टाइल बदलली नाही…यामुळे झालं काय तर पैसे वाचले आणि सेव्हिंग्ज देखील वाढल्या. व्यवस्थित पैसे जमल्यावर आम्ही दोघांनी आमच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती.”

हेही वाचा : “तुझा नवरा कुठे आहे?” गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावलं; म्हणाली, “Go Watch…”

अंथरुण पाहून पाय पसरावे

“आपल्या मध्यमवर्गीय घरांमध्ये ‘अंथरुण पाहून पाय पसरावे’ असं लहानपणापासून शिकवलं जातं. तेच आम्ही आत्मसात केलं होतं. त्यामुळे जेवढं आहे त्यापेक्षा कमी खर्च केला. यामुळे छान आयुष्य जगता येतं. आम्ही दोघांनी हे माझे पैसे, हे तुझे पैसे असं कधीच केलं नाही. कायम, दोघांचा मिळून विचार केला. त्यामुळे आमच्यात कधीच तुला जास्त काम मिळतंय, तुझ्याकडे जास्त पैसे आहेत वगैरे अशा गोष्टीही कधीच आल्या नाहीत. सगळं काही दोघांचं आहे असंच आम्ही कायम समजलं” असं ऐश्वर्या नारकरांनी स्पष्ट केलं.

Story img Loader