‘घे भरारी’, ‘तूच माझी भाग्यलक्ष्मी’, ‘सत्ताधीश’, ‘घर गृहस्थी’, ‘साक्षात्कार’, ‘रणरागिनी’, ‘ओळख’, ‘सून लाडकी सासरची’, ‘एक काळोखी रात्र’ ते ‘येलो’, ‘बाबांची शाळा’, ‘धडक’ या आणि अशा अनेक मराठीसह हिंदी चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर(Aishwarya Narkar). चित्रपटांसह त्यांनी नाटक-टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.
ऐश्वर्या नारकर कोकणात
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करताना दिसल्या. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्या कोकणात गेल्याचे या व्हिडीओवरून समजत आहे. त्या चुलीसमोर बसल्या असून चुलीवर एक भांडे असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर त्यांनी ‘कोकण व्हाइब्ज'(Kokan Vibes) असे लिहून त्यासमोर हार्ट इमोजी शेअर केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘फील'(Feel) अशी कॅप्शन लिहिले आहे. ‘अभी ना जाओ छोड़ कर’ हे गाणे ऐकायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
ऐश्वर्या नारकर या विविध व्हिडीओ, रील्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात, मनोरंजन करत असतात. अनेकदा त्या सहकलाकारांबरोबरदेखील रील्स करताना दिसतात. अभिनेते व पती अविनाश नारकर यांच्याबरोबरचे डान्सचे व्हिडीओ ऐश्वर्या नारकर शेअर करताना दिसतात. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या रील्सवर प्रेक्षक कमेंट्स करत त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. हे जोडपे चाहत्यांचे आवडते असल्याचे पाहायला मिळते.
अविनाश नारकर सध्या नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत, तर ऐश्वर्या नारकर काम करत असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत त्यांनी रूपाली, विरोचक, शतग्रीव, मैथिली अशा विविध भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षकांनी त्यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. आता त्या कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.