Aishwarya Narkar On Zee Marathi Awards : ‘झी मराठी’ वाहिनीला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी या वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेतील कलाकारांचा सन्मान करण्यासाठी ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याचं आयोजन केलं जातं. यंदा वाहिनीला २५ वर्षे पूर्ण झाल्याने सोहळ्याचं स्वरुप काहीसं भव्य होतं. सर्वोत्कृष्ट नायिका, नायक, लोकप्रिय मालिका असे अनेक पुरस्कार यावेळी देण्यात आले. यासाठी प्रेक्षकांनी देखील व्होट्स केले होते.

गेली दोन वर्षे सर्वोत्कृष्ट खलनायिकेच्या पुरस्कारावर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील भुवनेश्वरीने नाव कोरलं आहे. या कॅटेगरीत ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकरांना देखील नामांकन मिळालं होतं. मात्र, दोन्ही वर्ष त्यांना पुरस्कार जिंकता आला नाही. याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय त्यांना इन्स्टाग्राम ‘आस्क मी सेशन’मध्ये सुद्धा प्रश्न विचारले होते. आता अभिनेत्रीने ( Aishwarya Narkar ) युट्यूब व्हिडीओ शेअर करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”

हेही वाचा : रितेश भाऊ अन् जिनिलीया वहिनींकडून खास निमंत्रण! सूरज चव्हाण देशमुखांच्या घरी केव्हा जाणार? म्हणाला, “ते देवमाणूस…”

“हिरमुसल्यासारखं झालं कारण…”, ऐश्वर्या नारकर काय म्हणाल्या?

ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) म्हणाल्या, “अलीकडेच झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला. यावर माझी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सुरू आहे. तुम्ही सगळे बघतच असाल…यामध्ये मी नकारात्मक भूमिका साकारत आहे. आधी रुपाली, विरोचक, शतग्रीव या भूमिका मी साकारल्या आहेत. आता सध्या मी साकारतेय त्या भूमिकेच नावं मैथिली आहे ही काहीसं सकारात्मक आहे. मला खलनायिकेसाठी नामांकन मिळालं होतं पण, पुरस्कार मिळाला नाही, गेल्यावर्षी सुद्धा पुरस्कार मिळाला नव्हता. अर्थात यामुळे मला काहीसं हिरमुसल्यासारखं झालं. कारण, मला पुरस्कार खूप आवडतात. मला वाटतं ती आपल्या कामाची पोचपावती असते. आपल्याला लोकाश्रय मिळतो…आणि लोकांना आपलं काम आवडतंय हे पाहून जास्त छान वाटतं. या लोकाश्रयाबरोबर राजाश्रय मिळणं ही फार चांगली गोष्ट असते त्यामुळे मला अवॉर्ड्स खूप आवडतात. पण, दोन्ही वर्षी मला पुरस्कार मिळाला नाही. झी मराठीचं यंदाचं २५ वं वर्ष होतं त्यामुळे एकंदर हा सोहळा खूपच दिमाखदार झाला.”

हेही वाचा : मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो

Aishwarya Narkar
ऐश्वर्या नारकरांनी मांडलं स्पष्ट मत ( Aishwarya Narkar )

ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) पुढे म्हणाल्या, “पुरस्कार मिळणं, न मिळणं हे आपल्या हातात नसतं. आपण आपलं काम १०० टक्के करणं हे नक्कीच आपण करू शकतो. आपल्या कामाची पोचपावती नेहमीच आपल्याला लोकांकडून मिळत असते. मी समाधानी आहे कारण, मी जी भूमिका साकारतेय…ते काम लोकांना खूप आवडतंय. ते मला नेहमी सांगतात आम्हाला रुपालीचा ( मालिकेतील भूमिका ) राग येतो. हे कौतुक माझ्यासाठी खूप आहे. इथून पुढेही आपण असंच काम करत राहुयात असं वाटतं आणि मी सुद्धा प्रमाणिकपणे माझं काम करत राहीन” असं ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं.

Story img Loader