Kolkata Doctor Rape and Murder Case : कोलकातामधील आर. जी. आर वैद्यकीय महाविद्यालयातील घडलेल्या घटनेनंतर देशभरात एकच खळबळ माजली आहे. प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळण्याकरिता रस्त्यावर उतरून निषेध व आंदोलनं केली जात आहेत. कलाकार मंडळी देखील आपली परखड मत मांडताना दिसत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर करून कोलकाता प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. तसंच विचार करायला लावणारा मुद्दा त्यांनी मांडला आहे.

कोलकातामधील घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा अस्वस्थेचं वातावरण पसरलं आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांनी कोलकाता प्रकरणातील तरुणीला श्रद्धांजली वाहत आपलं मत व्यक्त केलं आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो

हेही वाचा – Video: ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार संदीप खरेंची मुलगी, खास पोस्ट करत म्हणाले, “लाडक्या लेकीची दुसरी मालिका…”

ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) म्हणाल्या, “गेले काही दिवस आपण कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार, हत्येविषयी ऐकतोय आणि अंतर्मुख होतोय. या सगळ्या विषयावर बोलण्याचं माझ्यात पण धारीष्ट नव्हतं. त्यामुळे थोडे दिवस मी थांबत होते. कारण जे घडलंय ते मानवी संवेदनाच्या बाहेरचं आहे. हे अमानवी आहे. याच्यावर रिअ‍ॅक्ट होणं किंवा काहीतरी करणं. याच्यावर काही पर्यायचं दिसत नाहीये. मला असं वाटतं, आतापर्यंत आपण मुलींना सशक्त करत होतो, सबळ करत होतो, काय वागायचं, काय वागू नये, काय चुकीच आहे, काय बरोबर आहे, हे आपणं मुलींनाच शिकवण्याचा प्रयत्न करत होतो. पण मला असं वाटतं आपल्या घरातील मुलांना संस्कारित केलं आणि मुलांना याची जाणीव करून दिली की, काय चुकीच आहे, तुम्ही एखाद्या स्त्रीबरोबर, एखाद्या मुलीबरोबर किंवा एका माणसाने दुसऱ्या माणसाबरोबर कसं वागायला हवं, याचे संस्कार जर आपण आपल्या घरातून दिले तरच हे कुठेतरी थांबू शकत.”

“ही एकच केस नाहीये. आपल्या आजूबाजूला अनेक केस घडत आहेत. त्या आपल्याला कळतंही नाहीत. तर मला असं वाटतं की, हे अमानवी कृत्य थांबवण्यासाठी आपण आपल्या पुढच्या पिढीला संस्कारीत करणं खूप गरजेचं आहे. ते केलं तरच कुठेतरी हे थांबू शकत. त्यामुळे मला असं वाटतं, आपण सगळ्यांनी यादृष्टीने विचार करायला हवा. मनापासून श्रद्धांजली,” असं ऐश्वर्या नारकर म्हणाल्या.

हेही वाचा – Video: बाबा रणबीर कपूरचा बोट पकडून राहाने पाहिलं नवं घर, व्हिडीओ झाले व्हायरल

नेटकरी काय म्हणाले?

ऐश्वर्या नारकरांच्या ( Aishwarya Narkar ) या मतावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. “तुम्ही बरोबर बोलतं आहात”, “मुलांची मानसिकता तशी घडवणं खूप गरजेचं आहे”, “अगदी खरं म्हणालात. मुलांना चांगले संस्कार दिले तर कुठेतरी हे जाऊन थांबू शकत. कायदा, शिक्षा या सगळ्याआधी आपण आपल्या मुलांना चांगली शिकवणं दिली तर अशा घडनांना आळा बसू शकतो”, “तुमच्या मतावरती आम्ही अगदी सहमत आहे. समाजाने यावर विचार करायलाच हवा,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader