Bigg Boss Marathi Aishwarya Narkar : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. सध्या सर्वत्र या पर्वाच्या ग्रँड फिनालेची आणि यंदा ‘बिग बॉस’ची ट्रॉफी कोण उंचावणार याची चर्चा रंगली आहे. पाचव्या पर्वाला यावर्षी २८ जुलैपासून सुरुवात झाली होती. पहिल्या दिवसापासून हे पर्व चांगलंच चर्चेत आहे. घरात झालेले वाद, भांडणं, टास्क, निक्की-अरबाजची मैत्री, टीम B चा खेळ या सगळ्या गोष्टींमुळे यंदाचा सीझन सुपरहिट ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीजनमध्ये झालेल्या वादांवर सामान्य लोकांप्रमाणे कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. काही कलाकारांनी तर ‘बिग बॉस’च्या घरात एक दिवस जाण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. याशिवाय प्रिया बापट, सई ताम्हणकर असे बहुतांश कलाकार यंदाच्या सीझनबद्दल व्यक्त झाले होते. अशातच मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांना त्यांच्या चाहत्याने ‘बिग बॉस’बद्दल प्रश्न विचारला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 : सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात पुन्हा एंट्री, पण ‘तो’ एक सदस्य गैरहजर; नेटकरी म्हणाले…

ऐश्वर्या नारकरांचं चाहत्याला उत्तर

मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) घराघरांत लोकप्रिय झाल्या. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ऐश्वर्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यात “बिग बॉस’ची ऑफर आली तर स्वीकारणार का?” असा प्रश्न अभिनेत्रीच्या चाहत्याने त्यांना विचारला. चाहत्याच्या हटके प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांनी काय उत्तर दिलंय जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss 18 House Tour : गुहेसारखं स्वयंपाकघर, तर किल्ल्यासारखी बेडरूम, पाहा बिग बॉसच्या घराची पहिली झलक

ऐश्वर्या नारकरांचं चाहत्याला उत्तर ( Aishwarya Narkar )

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “तुझं बाहेर लफडं असेल…”, अखेर अरबाज-निक्की आले समोरासमोर! कोटवरील ‘त्या’ नावाने वेधलं लक्ष

चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर ‘नाही’ असं एका शब्दात अभिनेत्रीने ( Aishwarya Narkar ) उत्तर दिलं. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’बद्दल सांगायचं झालं, तर उद्या ( ६ ऑक्टोबर ) या शोचा ग्रँड फिनाले सोहळा पार पडणार आहे. रितेश देशमुख यावेळी यंदाच्या पर्वाचा विजेता कोण ठरणार याची घोषणा करणार आहे.