ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची एव्हरग्रीन जोडी मराठी कलाविश्वासह सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. हे दोघेही ट्रेडिंग गाण्यांवर जबरदस्त डान्स करून रील्स व्हिडीओ बनवत असतात. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय जोडी म्हणून या जोडप्याला ओळखलं जातं. आजवर विविध मालिकांमधून ऐश्वर्या व अविनाश यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये या जोडीने आपला ठसा उमटवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या व अविनाश यांच्या प्रत्येक व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून असंख्य प्रतिक्रिया येतात. विशेषत: त्यांच्या डान्स व्हिडीओवर अनेकदा मिलियनच्या घरात व्ह्यूज येतात. अशातच काही नेटकऱ्यांकडून अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातात. अलीकडच्या काळात अनेकदा सेलिब्रिटींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. परंतु, या नेटकऱ्यांना कलाकार देखील जशास तसं उत्तर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या नारकर देखील त्यांच्या ट्रोलर्सला कमेंट सेक्शनमध्येच स्पष्ट शब्दांत सुनावतात.

हेही वाचा : Video : लंडन ब्रिजजवळ स्वप्नील जोशीचा ‘या’ अभिनेत्रीबरोबर रोमँटिक डान्स, ऋषी कपूर-श्रीदेवी यांच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकले, पाहा व्हिडीओ

ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या डान्स व्हिडीओला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळतो. तर, अभिनेत्रीचे काही व्हिडीओ योग संदर्भात किंवा आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर आधारित असतात. अशाच एका व्हिडीओवर नेटकऱ्याने अविनाश नारकर यांच्याबाबत एक कमेंट केली आहे. “नवरा फक्त नाचायच्या वेळेसच असतो वाटतं. योगा करायला पण घेत जा.” अशी कमेंट या युजरने ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर केली आहे.

नेटकऱ्याची ही कमेंट अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर रिशेअर केली आहे. “स्वत:च्या २ पोस्ट आणि आवाज किती तुमचा…” असं उत्तर देत ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याला स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. याशिवाय ट्रोल करणाऱ्या युजरच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचा स्क्रिनशॉट देखील अभिनेत्रीने या पोस्टसह शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : ‘प्रेमाची गोष्ट’मधील स्वातीचा चिमुकल्या सईबरोबर श्रेया घोषालच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “आत्या आणि भाची…”

ऐश्वर्या नारकर यांनी नेटकऱ्यांनी दिलं उत्तर

दरम्यान, दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. यात त्या रुपाली नावाचं नकारात्मक पात्र साकारत आहेत. तसेच अविनाश नारकर यांच्या ‘कन्यादान’ मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता लवकरच ते ‘डंका हरी नामाचा’ या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट १९ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar replied to netizen who troll her for dance video sva 00