Aishwarya Narkar Replied To Netizens : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून या दोघांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय हे दोघंही लोकप्रिय गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवून चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. या दोघांच्या डान्स व्हिडीओवर मिलियनच्या घरात व्ह्यूज येतात असं जरी असलं, तरीही अनेकदा या जोडप्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

ऐश्वर्या व अविनाश नारकर मराठीपासून, बॉलीवूड ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गाण्यांवर जबरदस्त डान्स व्हिडीओ बनवत असतात. त्यांच्या डान्सचं सर्वत्र कौतुक करण्यात येतं. अगदी इंडस्ट्रीमधील कलाकार सुद्धा या जोडप्याचे चाहते आहेत. तरीही अनेकदा ऐश्वर्या व अविनाश यांना नकारात्मक कमेंट्सचा सामना करावा लागतो. अशावेळी अभिनेत्री स्पष्ट शब्दांत उत्तर देत संबंधित नेटकऱ्याला खडेबोल सुनावतात.

Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anjali damania on dhananjay Munde
Dhananjay Munde : अंजली दमानियांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक, एक्स पोस्टद्वारे इशारा; म्हणाले, “मोघम आरोप करणाऱ्या…”
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”

हेही वाचा : कालेलकरांच्या प्रसिद्ध चित्रपटांच्या ‘सिक्वेल’साठी प्रयत्न सुरू; मधुसुदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या नावाने निर्मिती संस्थेची घोषणा

ऐश्वर्या नारकरांचं नेटकऱ्याला स्पष्ट उत्तर ( Aishwarya Narkar )

ऐश्वर्या व अविनाश यांनी नुकताच एका लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. यावर काही युजर्सनी ट्रोल करत नकारात्मक कमेंट्स केल्या होत्या. या सगळ्या ट्रोलर्सला अभिनेत्रीने चांगलंच सुनावलं आहे. “दोघे एकत्र बरे दिसत आहेत…पण श्रीयुत नारकर यांनी तोंडाचे आचरट हावभाव केले नाहीत तर खूप सुसह्य होईल” या कमेंटला उत्तर देत ऐश्वर्या नारकर लिहितात, “अनफॉलो केलंत तरी फार सुसह्य होईल… इथे खूप चांगले लोक आहेत…तुम्ही नाही त्यात शोभत”

aishwarya narkar
ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar )

नारकर जोडप्याच्या व्हिडीओवर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट केली होती. “बघ आता आजोबा लेका स्वत:ला लाज वाटली पाहिजे…काय करतो आजोबा तू” यावर “लेका झीरो पोस्ट तुझ्या…लाज तुला वाटायला हवी” असं स्पष्ट उत्तर देत याचे स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत अभिनेत्रीने या नेटकऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

हेही वाचा : गणपतीच्या निमित्ताने घरातल्यांची गोष्ट ; ‘घरत गणपती’ या चित्रपटातील कलावंतांची ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट

narkar
ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar )

दरम्यान, ऐश्वर्या नारकर नेहमीच अशा ट्रोलर्सला स्पष्ट शब्दांत उत्तर देत असतात. याशिवाय त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली हे पात्र साकारत आहेत. तर, अविनाश नारकरांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डंका’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Story img Loader