Aishwarya Narkar : मराठी नाटक, चित्रपट व मालिका अशा तिन्ही माध्यमांमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांना ओळखलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेली कित्येक वर्षे त्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ऐश्वर्या यांच्या फिटनेसचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं. योगा करून त्या स्वत:ला फिट ठेवतात. याशिवाय ऐश्वर्या व त्यांचे पती अविनाश विविध ट्रेडिंग गाण्यावर रील्स व्हिडीओ बनवून कायम चर्चेत असतात.
ऐश्वर्या नारकरांना या डान्स व्हिडीओमुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. परंतु, सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना अभिनेत्री नेहमीच स्पष्ट शब्दांत उत्तर देत असतात. त्यांनी नुकताच “फुलले रे क्षण माझे…” या जुन्या मराठी गाण्यावर खास व्हिडीओ बनवला होता. यासाठी अभिनेत्रीने खास गुलाबी रंगाची पैठणी साडी, नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने नकारात्मक कमेंट केली आहे.
हेही वाचा : Bigg Boss च्या घरात पहिलं नॉमिनेशन! निक्की-अंकिताची एकमेकींना धक्काबुक्की, पाहा जबरदस्त प्रोमो
ऐश्वर्या नारकर यांनी नटून थटून काढलेल्या या व्हिडीओवर एक नेटकरी म्हणतो, “आता तोंडावर लाली पावडर नाही केली तर भयानक नाही का” याशिवाय या कमेंटच्या पुढे नेटकऱ्याने हसायचे इमोजी सुद्धा जोडले आहेत.
ऐश्वर्या नारकरांनी नेटकऱ्याला दिलं उत्तर ( Aishwarya Narkar )
ऐश्वर्या नारकरांनी या कमेंटच्या स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत या युजरला चांगलंच सुनावलं आहे. “ज्याला आपण प्रत्यक्ष भेटलो नाही…त्यांच्या बाबतीत उपटसुंभासारखं विधान करण्याची हुशारी” असं स्पष्ट उत्तर अभिनेत्रीने या नेटकऱ्याला दिलं आहे.
दरम्यान, ऐश्वर्या नारकरांनी ( Aishwarya Narkar ) याआधी सुद्धा अनेकदा युजर्सला स्पष्ट शब्दांत उत्तरं दिली आहेत. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे.