लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली ही खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ऐश्वर्या यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ५३ वर्षांच्या ऐश्वर्या खूप उत्साही आहेत, त्या त्यांच्या दिनचर्येचे अनेक फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

ऐश्वर्या यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात त्या टीमबरोबर डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘डान्स हा खरा संघर्ष आहे’ असं कॅप्शन दिलं होतं. सोबतच त्यांनी हसणारे इमोजीही टाकले होते. त्यांच्या या व्हिडीओवर एका युजरने कमेंट करत ऐश्वर्या यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या युजरला उत्तर दिलं आहे.

“म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा” म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “तुमच्या घराण्यात…”

“म्हातारपणात डान्स करणं अवघड आहे,” अशी कमेंट त्यांच्या व्हिडीओवर एका युजरने केली होती. त्याला ऐश्वर्या नारकरांनी उत्तर दिलं. “तुम्ही करूच (डान्स) नका”, असं त्या युजरला म्हणाल्या.

Aishwarya Narkar Slams Troller
ऐश्वर्या नारकर यांनी ट्रोलरला दिलेलं उत्तर

दरम्यान, ऐश्वर्या नारकर व त्यांचे पती अविनाश नारकर हे मराठी अभिनयसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. दोघेही त्यांचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यांचे रील्स चाहत्यांना खूप आवडतात. काही ट्रोलर्स त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ऐश्वर्या नारकर सडेतोड उत्तर देत असतात.

Story img Loader