आज १६ जून रोजी जगभरात ‘फादर्स डे’ (Fathers Day) साजरा केला जातोय. अनेक कलाकार आपल्या वडिलांबरोबरचे खास क्षण टिपणारे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपल्या बाबांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा देत आहेत.

बॉलीवूडसह अनेक मराठी कलाकारांनी आपल्या वडिलांबरोबरचे फोटो शेअर करत काही किस्से, आठवणी प्रेक्षकांबरोबर शेअर केल्या आहेत. यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीदेखील आपल्या वडिलांबरोबरचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा… “फ्लावर नही फायर है…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी आणि ऋषिकेशचा ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर हटके डान्स, चाहते म्हणाले…

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. अनेकदा त्या मालिकेच्या सेटवरील सहकलाकारांबरोबरच्या रिल्स चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यांच्या रिल्स कायम चर्चेत असतात. आता त्यांनी एका खास व्यक्तीसाठी एक खास रील शेअर केली आहे, ती व्यक्ती म्हणजे ऐश्वर्या नारकर यांचे बाबा.

ऐश्वर्या नारकर यांनी ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा देण्यासाठी हा खास व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत त्यांचे आई-बाबा दिसतायत. या व्हिडीओला “जिंदगी तेरे नाम” हे गाणं अभिनेत्रीने जोडलं आहे. “माझ्या आयुष्यातला माणूस (The man in my life) #बाबा.. बाबांची पल्लू…” असं सुंदर कॅप्शन ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला दिलंय.

हेही वाचा… VIDEO: “वहिनी म्हणतील…”, रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “देखण्या आई-बाबांची देखणी मुलगी”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “खूपच सुंदर.”

हेही वाचा… Fathers Day: नुकत्याच बाबा झालेल्या वरुण धवनने शेअर केला लेकीबरोबर खास फोटो, म्हणाला, “मुलीचा बाबा…”

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत विरोचक ही खलनायिकेची भूमिका त्या साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे, तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.

Story img Loader