ऐश्वर्या नारकर यांना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. ‘या सुखांनो या’, ‘लेक माझी लाडकी’ या गाजलेल्या मालिकांमधून त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या. मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं. वयाच्या पन्नाशीतही त्यांनी आपला फिटनेस उत्तमप्रकारे जपला आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ऐश्वर्या त्यांच्या चाहत्यांना वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील अनेक अपडेट्स देत असतात. त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.

ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओमध्ये वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने यामध्ये निळ्या रंगाचं टीशर्ट व त्यावर फ्लॉवर प्रिंटेड शॉर्ट्स परिधान केली आहे. या व्हिडीओला ऐश्वर्या यांनी “सुपर फन” असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीचा हा नवीन व हटके वेस्टर्न लूक पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : आघाडीची अभिनेत्री असलेल्या स्पृहा जोशीला एकेकाळी वाटायची ऑडिशनची भीती! म्हणाली, “घराबाहेर पडायचे अन्…”

ऐश्वर्या नारकरांची एक चाहती या व्हिडीओवर कमेंट करत लिहिते, “तुम्ही एकत्र कुटुंबात राहता सासू नणंद वगैरे…असं तुम्ही एका मुलाखतीत सांगितलं होतं. खरचं का? तुमच्या सासरचे खूप समजूतदार व तुम्हाला पाठिंबा देतात वाटतं. आमच्याकडे तर भुवया वर होतील आणि डोळेबंद होतील.” यावर उत्तर देत अभिनेत्री लिहिते, “हो ते खूप समजूतदार आहेत. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो.”

हेही वाचा : उत्तर प्रदेशमधील फिल्म सिटीसाठी अक्षय कुमार, बोनी कपूर खर्च करणार तब्बल १०,००० कोटी रुपये? मोठी माहिती समोर

“कपड्यांचं काही नाही अहो…आपल्याला आरामदायी वाटणं महत्त्वाचं. या सगळ्यात कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो.” असंही ऐश्वर्या नारकरांनी त्यांच्या कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Aishwarya narkar
ऐश्वर्या नारकर

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर त्यांच्या अन्य काही चाहत्यांनी देखील कमेंट करत अभिनेत्रीच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत.

Story img Loader