९०च्या दशकापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार मराठमोळं कपल ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर नेहमी चर्चेत असतात. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून दोघांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या जोडीच्या इन्स्टाग्राम रिल्स कायम चर्चेत असतात.
आज महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी केली जातेय. अनेक मराठी अभिनेत्रींनी आपल्या पतीसाठी उपवास करून ही वटपौर्णिमा साजरी केली आहे आणि या खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या पतीला अगदी वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा… ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अपर्णाने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली…
ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाश यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघं एकमेकांशी बॉक्सिंग करताना दिसतायत. हा एक मजेशीर रीलचाच भाग आहे. यात मजेशीर रीलमध्ये अविनाश यांच्याकडून टुकून ऐश्वर्या यांच्या डोळ्याला मार लागतो. या व्हिडीओला कॅप्शन देत ऐश्वर्या नारकर यांनी लिहिलं, “तरी नवरा हाच पाहिजे”
तर या व्हिडीओला कॅप्शन देत ऐश्वर्या नारकर यांनी लिहिलं, “वट- पौर्णिमेच्या शुभेच्छा.” वटपौर्णिमेच्या निमित्ताने हा मजेशीर व्हिडीओ शेअर केल्याने दोघांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या कपलच्या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स आल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “ही वटपौर्णिमा आहे की बॉक्सिंग पौर्णिमा” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “वड पुजल्यानंतर भांडा” अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर विरोचक या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.
या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे, तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत; तर सन मराठी वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत अविनाश नारकर शेवटचे झळकले होते.