Aishwarya Narkar And Avinash Narkar : दिवाळी पाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या सणाला आपण बलिप्रतिपदा या नावाने देखील ओळखतो. या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि नवरा या शुभदिवशी बायकोला खास भेटवस्तू देतो अशी प्रथा आहे. सामान्य लोकांप्रमाणे मनोरंजन विश्वातील कलाकार सुद्धा दिवाळीचे हे ३-४ दिवस शूटिंगमधून ब्रेक घेत आपल्या घरी आनंदाने सणवार साजरे करतात.

मराठी कलाविश्वात ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) व अविनाश नारकर यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या दोघांची जोडी सोशल मीडियावरील व्हायरल रील्स व्हिडीओमुळे कायम चर्चेत असते. हे दोघंही ट्रेडिंग गाण्यांवर डान्स करताना दिसतात. याशिवाय गेली अनेक वर्षे या जोडप्याने मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या दोघांचा दिवाळी पाडव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांचं प्रेम पाहून नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

हेही वाचा : लग्नानंतर चार वर्षे दूर राहिले, करिअरमध्ये साथ अन्…; दिवाळी पाडव्याला मृणाल दुसानिसने पती नीरजचं केलं कौतुक

अविनाश यांनी ऐश्वर्या नारकरांना दिलं सुंदर गिफ्ट

दिवाळी पाडल्याच्या सणाला ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) सुंदर साडी, केसात गजरा, नाकात नथ, हातात चुडा असा पारंपरिक लूक करून तयार झाल्याचं यामध्ये पाहायला मिळत आहे. तर, अविनाश नारकर मेहंदी रंगाचा कुर्ता घालून तयार होऊन बसले होते. यावेळी अभिनेत्री सुरुवातीला त्यांचं औक्षण करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. औक्षण झाल्यावर अविनाश नारकर आपल्या पत्नीला सुंदर असं गिफ्ट देतात. आता हे गिफ्ट काय याचा उलगडा ऐश्वर्या यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये केला आहे.

“दिवाळी पाडवा… ठुशी आणि कानातले आले गिफ्ट म्हणून…पहिली ठुशी!” असं कॅप्शन ऐश्वर्या यांनी या व्हिडीओला दिलं आहे. यावरून अभिनेत्रीला पाडव्यानिमित्त अविनाश यांनी ठुशी आणि सुंदर कानातले गिफ्ट दिल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : Video : तितीक्षा तावडेचं सासरचं घर पाहिलंत का? दिवाळीच्या दिवशी दाखवली घराची झलक; दारावर आहे खास नेमप्लेट

दरम्यान, नेटकऱ्यांनी या दोघांच्या ( Aishwarya Narkar ) व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “तुम्ही दोघं खूपच गोड आहात…लव्ह युअर बाँड”, “जन्मोजन्मी तुमचं प्रेम अबाधित राहो”, “तुमच्यासारख्या जोडप्याचा आदर्श घेऊन जीवन नक्कीच सुखी होईल”, “सुंदर जोडी अशीच राहा” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

Story img Loader