अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे फिटनेस व्हिडिओ सर्वाधिक चर्चेत असतात. त्यांच्या फिटनेस व सौंदर्याचं चाहत्यांकडून नेहमीच कौतुक करण्यात येतं. सध्या त्यांनी लेकाबरोबरचा खास फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या नारकरांच्या लेकाचं नाव अमेय आहे. अमेयबरोबरचा लहानपणीचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपला फिटनेस उत्तमप्रकारे जपल्यामुळे त्यांना एवढा मोठा मुलगा आहे हे पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकित होतात.

हेही वाचा : Video:आमदार धिरज देशमुखांच्या सासूबाईंना पाहिलंत का? रकुल व जॅकीबरोबरचा व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री फोटो शेअर करत लिहितात, “विचार केलेला सूंतर आई बनेन आणि मी खरंच बनून दाखवलं” अर्थात योगा, व्यायाम, योग्य आहार घेतल्याने हा फिटनेस जपल्याचं त्या अनेक व्हिडीओमध्ये सांगतात.

हेही वाचा : १८ वर्षांचा संसार अखेर मोडला, रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुषने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर अश्विनी कासार, सुरुची अडारकर, सीमा घोगळे, हेतल यादव या अभिनेत्रींनी कमेंट्स करत त्यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. याशिवाय ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या झी मराठीच्या मालिकेत रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar shares her fitness goals netizens and other actress praised her sva 00